बनोटी परिसरात रानडुकरांकडून मक्‍याचे नुकसान

विकास पाटील
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

बनोटी : बनोटी (ता.सोयगाव) परिसरात लष्करी अळीच्या प्रादुर्भाव होऊन झालेल्या नुकसानीनंतर रानडुकरांनी मका पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे. 

बनोटी : बनोटी (ता.सोयगाव) परिसरात लष्करी अळीच्या प्रादुर्भाव होऊन झालेल्या नुकसानीनंतर रानडुकरांनी मका पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे. 

मक्‍याचे उत्पन्न बऱ्यापैकी मिळत असल्याने यंदा शेतकऱ्यांनी मका पिकास प्राधान्य दिल्याने परीसरात मोठ्या प्रमाणावर क्षेत्रात त्याची लागवड करण्यात आली होती. पिक एका महिन्याचे झाल्यापासुन लष्करी अळीचा प्रार्दुभाव आणि दोन महिन्यांपासुन पावसाची एकसारखी संततधार चालल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पिकात रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. ती उभे पिक आडवी करीत असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत शेतीसाठी लागलेला खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 

गेल्या आठवड्यात वरठाण शिवारातील लताबाई सोळंके यांच्यासह योगेश सोळंके, सुरेखाबाई डोंगरसिंग सोळंके, बारकु महाजन यांच्या शेतात रानडुकरांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. दिवसभर शेतीकाम करुन दमलेला शेतकरी रानडुकरापासुन पिक वाचविण्यासाठी रात्रीला गटगटाने काठ्यालाठ्या घेवुन कडा पहारा देत आहेत. एका शेतातून हुसकावून लावल्यास दूसऱ्या शेतात मोर्चा वळवितात. पहारा देत असतांना अनेकवेळा ही रानडुकरे अंगावर धावुन येत असल्याचा प्रकार घडू लागल्याने अनेकजण जखमी झालेले आहेत. लष्करी अळीचा प्रार्दुभाव रानडुकरांच्या उपद्रवाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत असल्याने शेती करणे जोखमीचे झाले आहे. वनविभागाने तात्काळ रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शकंर महाजन, डी. डी. पाटील, विजयसिंग सोळंके, नंदुबापु सोळंके, बापु दादा सोळंके, अभिमान महाजन, सुभाष आबा, चिंधा सुर्यवंशी, प्रेमसिंग शिंदे, बी.टी.खंडाळे, पन्नालाल जैन, अनिल संसारे यांच्यासह शेतकऱ्यांकडुन होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wild Swines Destroyed Corn Crop In Banoti Area