सलाईनमध्ये शेवाळ - राज्यातील बाटल्यांचा वापर थांबविला, कंपनीवर गुन्हा नाेंदविणार

दत्ता देशमुख
बुधवार, 29 जानेवारी 2020

बीड येथील जिल्हा रुग्णालयातील सलाईनच्या बाटल्यांमध्ये शेवाळ असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. यासंदर्भात "सकाळ'ने वृत्त प्रकाशित करताच संबंधित बॅचमध्ये उत्पादित सर्व सलाईनच्या बाटल्यांचा वापर थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय संबंधित कंपनीवर गुन्हा नोंदविण्याचे संकत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. 

बीड - ज्या सलाईनच्या बाटलीत शेवाळ आढळले, त्या बॅचमध्ये उत्पादन केलेल्या सर्व सलाईनच्या बाटल्यांचा वापर थांबविण्याचे निर्देश राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना बुधवारी (ता. 29) देण्यात आले. हा प्रकार अक्षम्य गुन्हा असल्याचे सांगत निर्मिती कंपनीवर कारवाईचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दूरध्वनीवरून "सकाळ'शी बोलताना दिले.

सलाईनच्या बाटलीत शेवाळ आढळल्याचा प्रकार "सकाळ'ने चव्हाट्यावर आणल्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. डेनिस केम लॅब या उत्पादक कंपनीने 1807017142 या क्रमांकाच्या बॅचमध्ये उत्पादन केलेल्या एका बाटलीत शेवाळाचे घोष असल्याचे "सकाळ'ने मंगळवारी (ता. 28) समोर आणले. या सलाईनच्या बाटलीची मुदत सप्टेंबर 2020 मध्ये संपणार आहे.

हेही वाचा - नगर-बीड-परळी लोहमार्गासाठी शासनाकडून 63 कोटींचा निधी

या बाटतील द्रवामध्ये मोठ्या प्रमाणावर शेवाळाचे घोष आढळून आले. राज्य पातळीवरून खरेदी करून राज्यभरातील शासकीय रुग्णालयांना हा पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे मोठा अनुचित प्रकार घडण्याचीही शक्‍यता होती; परंतु बीड जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला. दरम्यान, यानंतर पुढे काय असा प्रश्‍न होता.

हेही वाचा - बीड जिल्ह्यात बिबट्याचा वावर, शेतकरी भयभीत

"ई सकाळ'मधून मंगळवारी व "सकाळ'च्या बुधवारच्या अंकात हे वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेत या बॅचच्या सलाईनचा वापर थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी हे आदेश दिल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले. राज्यभरातील शासकीय रुग्णालयांत हा वापर थांबविण्यात आला आहे. 

हेही वाचा - बीड जिल्ह्यात परिवर्तन पतसंस्थेच्या दोन संचालकांना बेड्या

अक्षम्य गुन्हा, मुळाशी जाऊ : राजेश टोपे 
हा प्रकार अक्षम्य गुन्हा आहे. निर्मिती कंपनीने उत्पादनाचे मानांकने पाळली नाहीत, निर्जंतुकीकरण केले नसल्याने हा प्रकार घडला असावा. याच्या मुळाशी जाऊन चौकशी करू, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा - निवडणूक काळातील खर्चाची उड्डाणे, बीडमध्ये झाडाझडती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Take Action on Drug Company - Minister For Health