esakal | बीड जिल्ह्यात परिवर्तन पतसंस्थेच्या दोन संचालकांना बेड्या 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

बीड जिल्ह्यातील माजलगाव शहर व तालुक्‍यातील हजारो ठेवीदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवी गोळा केल्या व नंतर मुदत उलटून गेल्यानंतर परतावा न देता हात वर करून फरारी असणाऱ्या दाेघा संचालकांना अटक करण्यात आली.

बीड जिल्ह्यात परिवर्तन पतसंस्थेच्या दोन संचालकांना बेड्या 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड - आर्थिक गुन्ह्यांतील फरार आरोपींच्या शोधासाठी गठित केलेल्या पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी (ता. 20) रात्री माजलगाव येथील "परिवर्तन मल्टिस्टेट' पतसंस्थेच्या दोन फरार संचालकांना बेड्या ठोकल्या. मात्र, यातील मुख्य आरोपी अद्यापही फरारच आहे. 

बंडू लिंबाजी नाईकनवरे (रा. सावरगाव ता. माजलगाव) व बळीराम भानुदास चव्हाण (रा. भवानीआई तांडा, टाकरवण) अशी त्या दोन संचालक आरोपींची नावे आहेत. परिवर्तन मल्टिस्टेटचे ते दोघेही संचालक आहेत. 2018 मध्ये त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता.

हेही वाचा - का वाढलाय ऑनलाईन वीजबिल भरणा 

माजलगाव शहर व तालुक्‍यातील हजारो ठेवीदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवी गोळा केल्या व नंतर मुदत उलटून गेल्यानंतर परतावा न देता हात वर केले. त्यानंतर ठेवीदारांनी पोलिसांत धाव घेतली. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. दरम्यान, दोन वर्षे उलटूनही आरोपी सापडत नसल्याने अखेर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी फरार आरोपींच्या शोधासाठी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा - नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

सोमवारी दोन फरार संचालकांना अटक करण्यात आली. परिवर्तनचा अध्यक्ष विजय अलझेंडे अद्याप फरारच आहे. पथकप्रमुख सहायक निरीक्षक एन. ई. केळे, पोलिस हवालदार मुंजाबा कुवारे, पोलिस नाईक राहुल शिंदे, शेख सिद्दिकी, राजू पठाण, अशोक दुबाले यांनी ही कारवाई केली. त्या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत (ता. 24) पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रशांत शिंदे यांनी दिली. 

loading image
go to top