esakal | जेवळी : पावसापेक्षा वाऱ्याचा प्रमाण जास्त, ऊसाची फडे आडवी
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

जेवळी : पावसापेक्षा वाऱ्याचा प्रमाण जास्त, ऊसाची फडे आडवी

sakal_logo
By
सुधीर कोरे

जेवळी : जेवळी परिसरात शनिवारी (ता. ४) रात्री नऊ ते साडे बारा या काळात मेघगर्जना, वादळीवाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यावेळी पावसापेक्षा वाऱ्याचा प्रमाण जास्त असल्याने येथील अनेक ऊसाची फडे आडवी झाली असून राशीसाठी काढून टाकलेल्या मूग उडीद पिकाचे नुकसान झाले आहे

    जेवळी परिसरात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असून पावसाअभावी पोत्याच्या राशी आदली- पायलीत आल्या आहेत. अनेकांनी अपेक्षित फळधारणा झाली नसल्याने उभ्या पिकात रोटाव्हेर फिरविले आहेत. यंदा परिसरातील नदी-नाल्यांना एकदाही पूर आले किंवा तलावात पाणी आले नाही. पैशाचा पिक म्हणून ओळख असलेल्या ऊसाचे लागवड या भागात मोठ्या प्रमाणात झाली आहे. पावसाअभावी पाण्याची कमतरता असताना शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करीत ऊसाची फडे जोमात आणली आहेत. परंतु शेतकऱ्या मागील संकट संपता संपत नसल्याचा प्रचिती पुन्हा आली.

हेही वाचा: कोल्हापूर : शेतकरी अपघात योजनेअंतर्गत १२६ शेतकऱ्यांना लाभ

शनिवारी (ता. ४) रात्री नऊ ते बारा या काळात प्रचंड मेघगर्जना, वादळीवाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या दोन तासात पावसापेक्षा वाऱ्याचा प्रमाण जास्त होता. या वादळी पावसाने येथील अनेक शेतकऱ्यांचे ऊसाची फडे ही आडवी झाली आहेत. राशीसाठी काढून टाकलेल्या मूग, उडीद पिकाचे नुकसान झाले आहे मोठ्या कष्टाने वाढविलेले ही उसाचे पिक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचा मोठा प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. हा पाऊस जेवळीस परिसरातील आष्टा कासार, फनेपूर, वडगाव, माळेगाव, हराळी, करवंजी, हिप्परगा, विलासपूर पाढंरी, धानूरी, भोसगा, दस्तापूर आदी गाव शिवारात कमी अधिक प्रमाणात झाली आहे. यांची माहिती मिळताच पंचायत समितीचे उपसभापती व्यंकट कोरे, कॉंग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय गाडेकर यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला यावेळी नुकसानीचा पंचनामे करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

loading image
go to top