esakal | माणुसकीचे दर्शन! युवकाच्या शस्त्रक्रियेसाठी एका दिवसात एक लाख जमा
sakal

बोलून बातमी शोधा

माणुसकीचे दर्शन! युवकाच्या शस्त्रक्रियेसाठी एका दिवसात एक लाख जमा

माणुसकीचे दर्शन! युवकाच्या शस्त्रक्रियेसाठी एका दिवसात एक लाख जमा

sakal_logo
By
सुधीर कोरे

जेवळी (जि.उस्मानाबाद) - जेवळी (ता.लोहारा) (Jewali) गरीब, होतकरू, वडिलांचे छत्र हरवलेल्या एका युवकाच्या शस्त्रक्रियेसाठी (ब्रेन ट्यूमर) (Brain Tumor)  व्हाॅट्सअप ग्रुपवर केलेल्या आर्थिक मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील नागरिकाने संबंधित रुग्णाच्या बॅंक खात्यात एक दिवसात एकूण एक लाख पस्तीस हजार रुपये जमा करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. याबाबत माहिती अशी, की तीस वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातून कुमार कनोजी हे कुटुंब जेवळी येते स्थायिक झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पत्र्याच्या शेडमध्ये राहत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लॉन्ड्रीचे दुकान (Osmanabad) चालवीत होते. सर्व काही ठिक चालले असतानाच दहा-बारा वर्षांपूर्वी कुटुंबप्रमुख कुमार कनोजी यांचे निधन झाले. यांच्या निधनाने पत्नी, दोन मुले, एक मुलगी असलेला कुटुंब अनाथ झाले. या नंतर आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होत गेली. यातूनही मोठा मुलगा रवी कनोजी या परिस्थितीत ही संघर्ष करीत पदवीधर झाला आहे.

हेही वाचा: पक्षाची ताकद वाढविण्यासाठी काम करा, जयंत पाटलांचे आवाहन

आता उदरनिर्वाहासाठी येथील एका वकिलाकडे सहायक म्हणून काम करीत आहे. काही दिवसांपूर्वी चालण्यास त्रास होत असल्याने स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने सोलापूर येथे तपासणी केल्यानंतर ब्रेन ट्यूमर झाल्याचे निदान झाले आहे. आता पुढील उपचारासाठी सोलापूर येथील गंगामाई मल्टिस्पेशलिस्ट रुग्णालयात दाखल केले असून यासाठी दोन टप्प्यात शस्त्रक्रिया करावे लागणार आहे.पहिल्या टप्प्यातील शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील शस्त्रक्रियेसाठी दोन लाखाचा खर्च अपेक्षित आहे. परंतु परिस्थिती हालाखीची असल्याने हा कुटुंबाना खर्चाचा भार उचलणे अशक्य आहे. ही बाब ॲड सुनील कोरे यांच्यामार्फत येथील शिवसेना तालुकाप्रमुख तथा सरपंच मोहन पणुरे यांना समजल्यानंतर त्यांनी संबंधित कुटुंबांना भेटून धीर देत पुढील शस्त्रक्रियेसाठी येथील व्हाॅट्सअॅप ग्रुपवर आर्थिक मदतीचा आव्हान केला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत रवी कनोजी यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने जेवळी व परिसरातील देश-विदेशात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिकाने रवी कनोजी यांच्या येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकच्या अकाउंटमध्ये (क्रमांक, 80024090967, IFSC - MAHG0004409) माणुसकीच्या नात्याने सढळ हाताने रक्कम जमा करीत आहेत. यात आमदार ज्ञानराज चौगुले, अमेरिकेतील सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले गौरीशंकर धरणे, डॉ संतोष ढोबळे यांच्यासह इतरांनी मदत केल्याने एका दिवसातच एकूण एक लाख पस्तीस हजार रुपये जमा झाले आहे, अशी माहिती सरपंच मोहन पणुरे यांनी दिली आहे.

loading image
go to top