esakal | उमरग्यात दोन दिवसांत 'तीन' बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश
sakal

बोलून बातमी शोधा

Child marriage

बालविवाह प्रतिबंध समितीला प्राप्त माहितीनुसार उस्मानाबाद येथे शुक्रवारी होणारा बालविवाह उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांच्या तात्काळ कार्यवाहीमुळे रोखण्यात बालविवाह प्रतिबंध समिती, प्रशासनाला यश लाभले आहे.

उमरग्यात दोन दिवसांत 'तीन' बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा (Umrga) तालुक्यात दोन दिवसांत तीन बालविवाह (Child Marriage) रोखण्यात बालविवाह प्रतिबंध समिती आणि प्रशासनाला यश मिळाले आहे. या बाबतची माहिती अशी की, शुक्रवारी (ता. चार) तालुक्यातील तलमोड येथे एका अल्पवयीन मुलीचे बालविवाह होणार असल्याची माहिती बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना पुणे येथील खबऱ्यामार्फत समजली होती. संबंधित माहिती उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार यांना कळविण्यात आली. तसेच  तालुक्यातील बलसुर येथेही शुक्रवारी बालविवाह होणार असल्याची माहिती उमरगा प्रशासनाला समजली होती. उपविभागीय अधिकारी श्री.उदमले यांच्या मार्गदर्शनाने, तहसीलदार श्री. पवार यांनी तत्परतेने महसूल विभागाचे मंडळ अधिकारी जयंत गायकवाड आणि त्यांच्या पथकाने बलसुर आणि तलमोड येथील परिवाराला भेटी देत समुपदेशन करून लेखी स्वरूपात हमीपत्र घेत बालविवाहाचे दुष्परिणाम आणि कायद्याची सखोल माहिती दिली. दरम्यान गुरूवारी (ता. तीन) सायंकाळी बालविवाह प्रतिबंध समितीला प्राप्त माहितीनुसार उस्मानाबाद येथे शुक्रवारी होणारा बालविवाह उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांच्या तात्काळ कार्यवाहीमुळे रोखण्यात बालविवाह प्रतिबंध समिती, प्रशासनाला यश लाभले आहे. एकंदरीत उस्मानाबाद (Osmanabad)जिल्ह्यात दोन दिवसांत एकूण तीन बालविवाह तत्परतेने नियोजित बालविवाह नियोजित वेळाआधीच रोखण्यात तहसीलदार संजय पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली. (Within Two Days Three Child Marriages Prevented In Umarga)

हेही वाचा: औरंगाबादेत कारमध्येच लसीकरण, सोमवारपासून होणार सुरुवात

लॉकडाऊन काळात बालविवाहाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. आपल्या मुलीला समजून घ्या. तिच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करा. तिला उच्चशिक्षित बनवा परिस्थितीचे कारण-निमित्त पुढे करत आपल्या स्वतःच्या मुलीला अंधाऱ्या खाईत ढकलू नका. मुलींच्या शिक्षणासाठी प्रशासन सदैव आपल्या सोबत आहे.

- संजय पवार, तहसीलदार, उमरगा

loading image