हिंगोलीत वैध कारणाशिवाय सरकारी कार्यालयात प्रवेश नाही, पोलिसही तैनात | Hingoli Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Restriction In Hingoli

हिंगोलीत वैध कारणाशिवाय सरकारी कार्यालयात प्रवेश नाही, पोलिसही तैनात

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना (Corona) विषाणूचा धोका वाढत असल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर (Jitendra Papalkar) यांनी संपूर्ण जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या सोबतच सरकारी कार्यालयात नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रमुख सरकारी कार्यालयाच्या पुढे मंगळवारी (ता.११) पोलिसांचा बंदोबस्त देखील लावला आहे. या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वैध कारण असल्याशिवाय कार्यालयात प्रवेश देण्यात येऊ नये, असे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहेत. अशा आशयाची नोटीस सुद्धा बोर्डावर लावली आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून झपाट्याने रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. लोकांची गैरसोय होऊ नये. यासाठी मेल आयडी व मोबाईल नंबरची यादी सुद्धा प्रसारित करण्यात आली आहे. (Without Valid Casuses No Entry In Governmental Offices, Hingoli District Collector Decision)

हेही वाचा: सावधान ! अमेरिकेत एकाच दिवशी १० लाखांपेक्षा अधिक जण कोरोनाबाधित

महत्त्वाचे काम असल्यास त्यावर संपर्क साधण्याची सूचना सुद्धा या नोटीसमध्ये केली आहे. जिल्ह्यात आजघडीला एकूण ४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सातत्याने ही रुग्णसंख्या वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. सोबतच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, विनामास्क फिरू नये. सामाजिक अंतर पाळावे, अशा सूचना सुद्धा नागरिकांना दिल्या आहेत. पुढील आदेशापर्यंत त्यांना शासकीय कार्यालयात जाण्यास मनाई आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पापळकर यांनी हे आदेश काढले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक घेऊन सर्व विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Hingoli
loading image
go to top