पाण्याविना पैनगंगा आटली

प्रकाश जैन
सोमवार, 6 एप्रिल 2020

तालुक्यातून वाहनाऱ्या पैनगंगा नदीकाठांवरती शेलोडा, शिरपल्ली, धानोरा, बोरगडी, बोरगडी तांडा, वारंगटाकळी, पळसपूर, डोल्हारी, घारापूर, टेंभुर्णी अशी अनेक गावे आहेत. या सर्व गावांची तहान भागवणारी नदी ही पैनगंगाच असून मात्र, गेल्या एक महिन्यापासून नदीपात्रात एकही थेंब पाणी नसल्याने गुराढोरांसह नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. तरी सुद्धा पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकलेले दिसत आहे.

हिमायतनगर, (जि.नांदेड) ः तालुक्यातून वाहनारी पैनगंगा नदी कोरडी ठाक पडली असून नदीकाठांवरील नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते आहे. ग्रामीण भागात जनावरांनासुद्धा पिण्याचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकट ओढवलेले दिसत आहे. तरी इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडवे, अशी मागणी नदीकाठांवरचे शेतकरी करीत आहेत.

शेतकऱ्यांपुढे मोठे संकट
तालुक्यातून वाहनाऱ्या पैनगंगा नदीकाठांवरती शेलोडा, शिरपल्ली, धानोरा, बोरगडी, बोरगडी तांडा, वारंगटाकळी, पळसपूर, डोल्हारी, घारापूर, टेंभुर्णी अशी अनेक गावे आहेत. या सर्व गावांची तहान भागवणारी नदी ही पैनगंगाच असून मात्र, गेल्या एक महिन्यापासून नदीपात्रात एकही थेंब पाणी नसल्याने गुराढोरांसह नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. तरी सुद्धा पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकलेले दिसत आहे.

हेही वाचा -  गरजूंच्या मदतीला धावले उद्योजक

शेतकऱ्यांनी नदीपात्रात पाणी राहील या आशेवर मोठ्या प्रमाणावर शेतात उन्हाळी ज्वारी व भुईमुगाची पेरणी केली. मात्र, नदीपात्रात पिकांना पाणी देण्यासाठी पाणीच नसल्याने हाता तोंडशी आलेली पिके कोजमून गेली आहेत. पिके तर गेली मात्र, गुराढोरांना तरी पाणी सोडा, अशी मागणी बळिराजा करीत आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी इसापूूूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडवे, अशी मागणी नदीकाठावरील शेतकरी करीत आहेत.

शेतकऱ्यांनी काय करावे हे सूचत नाही
आमच्या गुराढोरांना पाण्यासाठी पाणी नाही. कोसो दूर पाण्यासाठी भटकंती करून सुद्धा पाणी मिळत नसल्याने आम्ही शेतकऱ्यांनी काय करावे हे सूचत नाही. तरी जिल्हाधिकारी साहेबांनी इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडावे अशी मागणी राजू पाटील शेतकरी शेलोडा यांनी केली. तसेच आमची उन्हाळी ज्वारी व भुईमुगाचे पाक पाण्यावाचून गेले. मात्र, गुराढोरांना तरी पाणी सोडा, नाही तर आम्हाला गावे सोडण्याची वेळ येईल. जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन पैनगंगा नदीपात्रात इसापूर धरणातून पाणी सोडावे अशी मागणी प्रकाश वानखेडे, शेतकरी, पळसपूर यांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Without water, the Painganga slopes, nanded news