जालन्यातील पहिली बाधित महिला कोरोनामुक्त

महेश गायकवाड
Friday, 15 May 2020

जालना जिल्ह्यात पहिला कोरोना बाधीत रूग्ण  ता.६ एप्रिल रोजी दुखीनगरात आढळून आला होता. ही बाधित महिला न्यूमोनिया, मधुमेह, रक्तदाब या आजारानेही ग्रस्‍त होती. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस तिची प्रकृती गंभीर होती.

जालना -  जिल्ह्यातील पहिली कोरोना बाधीत म्हणून  आढळून आलेली  ६५   वर्षीय महिलेची कोरोना विरोधातील  झुंज यशस्‍वी झाली आहे.  चाळीस दिवस उपचारासाठी दाखल असलेल्या  या महिलेला शुक्रवारी (ता.१५) रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून तिला निरोप दिला.

जिल्ह्यात पहिला कोरोना बाधीत रूग्ण  ता.६ एप्रिल रोजी दुखीनगरात आढळून आला होता. ही बाधित महिला न्यूमोनिया, मधुमेह, रक्तदाब या आजारानेही ग्रस्‍त होती. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस तिची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी  शर्तीचे प्रयत्न करावे लागले.  

हेही वाचा : जालन्याला यायचंय, या लिंकवर करा अर्ज 

महिलेचे सलग दोन वेळा नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने डॉक्टरांच्या प्रयत्नांना ता.२९ एप्रिल  रोजी खरे यश आले.  मात्र, तिला इतर आजारामुळे सुटी देण्यात आली नव्हती. तिच्या इतर आजारावर उपचार केल्यांनतर ही महिला ठणठणीत बरी झाली.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील

त्यामुळे तिला शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी पाच वाजता रुग्णालयातून सुटी देण्यात आली.  

चार जवानांनाही मिळाला डिस्चार्ज

कोरोनाबाधित आढळून आलेल्या चार जवानांचा उपचारानंतर अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे गुरूवारी (ता.१४)  त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली, तर कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत महिला डॉक्टरचा अहवाल मात्र गुरूवारी पॉझिटिव्ह आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman discharge from hospital in Jalna