हळदी-कुंकवात क्‍विंटलभर धान्याचे वाण

Wheat-and-Rice
Wheat-and-Rice

औरंगाबाद - मकर संक्रांतीनिमित्त संक्रांतीचे वाण म्हणून एकमेकींना हळदी-कुंकवानंतर काहीतरी वस्तूंची भेट देण्याची परंपरा बाजूला सारून गुरव समाज महिला मंडळाने वेगळा पायंडा पाडला आहे. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात प्रत्येकीने आपापल्या घरून यथाशक्‍ती धान्य आणून वाण जमा केले. हे धान्य अन्न वाचवा समितीकडे सुपूर्द केले. हे धान्य दुष्काळग्रस्त भागातील गरजूंपर्यंत पोचवण्याचे काम अन्न वाचवा समितीमार्फत केले जाणार आहे. या हळदी-कुंकू कार्यक्रमात ६० किलो गहू, तर ४० किलो तांदूळ जमा झाले. 

जिल्हा गुरव समाज महिला मंडळाच्यावतीने रविवारी (ता.२७) सिडको एन सात येथील अयोध्यानगरीतील सिद्धेश्‍वर महादेव मंदिर प्रांगणात हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्न वाचवा समितीच्या वतीने या परिसरात केलेल्या जनजागृतीमुळे आपण या दुष्काळग्रस्तांसाठी काही करू शकतो का, या विचारातून ही संकल्पना पुढे आली. महिला मंडळाने अन्न वाचवा समितीच्या ‘भिक्षांदेही’ उपक्रमात सहभागी होऊन आपलेही योगदान द्यावे हा विचार पुढे आला आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा कविता कापसे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. ६० किलो गहू व ४० किलो तांदूळ जमा झाले. हे धान्य महापौर नंदकुमार घोडेले व माजी महापौर अनिता घोडेले यांच्या हस्ते अन्न वाचवा समितीचे अनंत मोताळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कविता कापसे, सुवर्णा धानोरकर, वैशाली गुरव, रोहिणी शेवाळे, मंगल काळे, कांता बचाटे, मीना साळुंके, सुवर्णा मुंगीकर, लक्ष्मी बनसोडे, सविता दांडगे, सरला मुंगीकर, मीना पाटील, सुवर्णा खंडाळकर आदींनी यासाठी परिश्रम घेतले. 

आणखी दोन ठिकाणी उपक्रम
जिल्हा गुरव समाज महिला मंडळातर्फे रविवारी (ता. तीन) पुंडलिकनगरातील गल्ली नंबर ५ येथे, तर रविवारी (ता. दहा) बजाजनगरातील जिजामातानगरातील महादेव मंदिरात हळदी- कुंकवाचा असाच कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे कविता कापसे यांनी सांगितले. सिडको एन- ७ येथे झालेल्या कार्यक्रमात शैव प्रबोधन टॉप टेन पुरस्कार वितरण व ॲपचे लोकार्पण करण्यात आले. तसेच दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. यावेळी प्रकाश हरताळकर, संतोष गुरव, ज्योती पिंजरकर, मंगल शर्मा, किरण शर्मा, जीवनगुरू भोगावकर, रामनाथ कापसे, पुंडलिक सोनवणे, रविकांत साळुंके, विष्णू बचाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन स. सो. खंडाळकर, तर आभार मंगल काळे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com