शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

पाचोड, जि. औरंगाबाद) - गवत आणण्यासाठी शेतात गेलेल्या 29 वर्षीय महिलेवर नात्यातीलच तरुणाने बलात्कार केल्याची घटना कोळीबोडखा (ता. पैठण) येथे गुरुवारी (ता. पाच) सकाळी घडली. संबंधित तरुणाविरुद्ध पाचोड (ता. पैठण) पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. 

गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास कोळी बोडखा शिवारातील शेतात संबंधित महिला गवत आणण्यासाठी गेली होती. ती गावातील एका शेताच्या बांधावर गवत घेत असताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तेथे अफसर सांडू शेख आला, यावेळी त्याने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, महिलेने नकार दिल्यानंतर त्याने धमकावून जबरदस्तीने अत्याचार केला, असे पाचोड पोलिस ठाण्यात महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

या घटनेनंतर पीडितेने झालेल्या प्रकाराची माहिती घरी गेल्यावर कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी पीडितेसह त्वरीत पाचोड पोलिस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी संबधित महिलेचा महिला दक्षता समितीच्या सदस्यासमोर "इन कॅमेरा' जबाब नोंदवून अफसर सांडू शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे, पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, जमादार जगन्नाथ उबाळे, नरेंद्र अंधारे, भगवान धांडे यांनी गावात जाऊन अफसर शेख यास अटक केली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman raped near pachaod