अंगण झाडणाऱ्या महिलेची पोत पळविली

crime
crime

नांदेड : सकाळी अंगण झाडून कचरा जाळण्यासाठी खाली बसलेल्या एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठन अनोळखी तीन चोरट्यांनी जबरीने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. 7) सकाळी सहाच्या सुमारास ज्ञानेश्‍वरनगर भागात घडली. 

तरोडा परिसरातील ज्ञानेश्‍वरनगर भागात संजय भाऊराव कदम हे आपल्या परिवारासह राहतात. मंगळवारी सकाळी त्यांची पत्नी अंगण झाडून जमा झालेला कचरा जाळण्यासाठी खाली बसल्या. यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्या गळ्यातील जवळपास 32 हजार रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण जबरीने तोडून घेऊन पळ काढला. आरडा- ओरडा करण्या आधीच चोरटे आलेल्या दुचाकीवरून पसार झाले.

संजय कदम यांच्या फिर्यादीवरुन अनोळखी तिघांवर भाग्यनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महिलांवर्गात भितीचे वातावरण पसरले असून सोनसाखळी चोरांची टोळी सक्रीय झाली की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रेवन डमाळे हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com