आजाराला कंटाळून तिने घेतले जाळून, माणुसकीला काळिमा फासणारी घटना

हबीबखान पठाण
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

क्षयरोगाला वैतागलेल्या चाळीस वर्षीय महिलेने अंगावर रॉकेल आेतून घेऊन जाळून घेतले. जळत असताना ती मदतीसाठी सर्वत्र सैरवैरा धावत असताना डोळ्यादेखत ती रस्त्यावर कोळसा होऊन मरण पावली.

पाचोड (जि.औरंगाबाद) ः क्षयरोगाला वैतागलेल्या चाळीस वर्षीय महिलेने अंगावर रॉकेल आेतून घेऊन जाळून घेतले. जळत असताना ती मदतीसाठी सर्वत्र सैरवैरा धावत असताना डोळ्यादेखत ती रस्त्यावर कोळसा होऊन मरण पावली. यावेळी अनेक जण केवळ बघ्याची भूमिका घेत होते, हे चित्र पाहुन माणसांतली माणुसकीच हरवल्याचे हदयद्रावक चित्र आवडे उंचेगाव (ता पैठण) येथे शनिवारी (ता. १२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

     आवडे उंचेगाव (ता. पैठण) येथील मनाबाई शेंडगे (वय ४०) या महिलेचे गावातील शिवाजी शेंडगे सोबत लग्न झाले होते. लग्नानंतर त्याला अपत्य झाली, त्यानंतर त्याला क्षयरोगाने ग्रासले.पतीने या आजाराची आपणांस लागण होईल म्हणुन दुसरे लग्न केले. परंतु मनाबाई सासरीच पतीकडे विभक्त राहु लागली. घरची जेमतेम परिस्थिती व आजारामुळे ती मनात खचू लागली, त्याला जिवन ओझे वाटू लागले व त्याने आयुष्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. चार दिवसापूर्वी तीने डाव्या कालव्यात उडी घेवून आत्महत्येचा निश्चय केला व त्याकडे निघाली ,परंतु तीची मुलगी दावरवाडी सासरहून आपल्या प्रसूतीसाठी माहेरी आई मनाबाईकडे आली. मुलीने तिची समजुत काढली व आत्महत्येपासून परावृत केले.

तीन दिवस उलटताच मनिषाने कुणाला काहीएक न सांगता सायंकाळी साडेसहा वाजता अंगावर रॉकेल घेऊन पेटवून घेतले. वेदना असह्य झाल्याने ती पेटलेल्या अवस्थेत मदतीसाठी विव्हळत शेजारच्या घरात घुसली. तेथून ती रस्त्यावर आली. वाचवा.. वाचवा म्हणुन ती मदतीची याचना करू लागली. तिच्या विव्हळ्ण्याने मोठा जमाव घटनास्थळी जमला. मात्र सर्वजण केवळ मरणाचा तमाशा पाहत उभे होते. अशातच ती जळून  मरण पावते. रस्त्यावर त्याचा मृतदेह बेवारसरित्या पडतो. रस्त्यावर आपल्या घरा शेजारी पडलेले मृतदेहाचे कुत्रे लचके तोडत असल्याचे व घरातील लहान बालके भित असल्याचे पाहुन काही जणांनी 'त्या' मृतदेहावर गोधड्या टाकून त्याला झाकून टाकले. ते मृतदेह रात्रभर रस्त्यावरच पडून राहीले.

त्याच्या सोपस्कारासाठी गावातले माहेर असुनही माहेरचे ,सासरचे व  कुणी गावातले धावून न आल्याचे पाहून माणुसकीच क्षीण झाल्याचे पाहवयास मिळाले. रविवारी (ता. १३) सकाळी या घटनेची पाचोड पोलिसांना माहीती देण्यात आली. माहीती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे, पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, रावसाहेब आव्हाड, संजय मदने, आप्पासाहेब माळी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह जळून जीर्ण झाल्याने पोलिसांनी विहामोडवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सोनकांबळे यांना नेवून जागेवरच उत्तसणीय तपासणी केली. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या पतीच्या ताब्यात आले. पोलिसानी दोन्ही परिवाराचे मनोमिलन घडवून अंत्यविधी सोपस्कार पार पाडण्यासाठी मोलाची भुमिका बजावली.

या प्रकरणी पाचोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली असून या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड,  पोलीस नाईक आप्पासाहेब माळी करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Set Fire Herself, Inhuman Incident