आष्टीत उष्माघाताने महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

आष्टी (जि. बीड) - लग्नसमारंभासाठी आष्टी येथे चाललेल्या महिलेचा वाहनातच उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

आष्टी (जि. बीड) - लग्नसमारंभासाठी आष्टी येथे चाललेल्या महिलेचा वाहनातच उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

तालुक्‍यातील सांगवी आष्टी येथील बिजूबाई डाडर (वय 55) ही महिला आष्टी येथे लग्नसमारंभासाठी एका पिकअप वाहनामध्ये बसून जात असताना उन्हाच्या तीव्रतेचा त्यांना त्रास होऊ लागला. गाडीमध्ये चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

Web Title: women death by sunstroke