बसमध्येच महिलेची प्रसूती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

बीड - गर्भवतीला बीड येथे रुग्णालयात घेऊन येत असताना बसमध्येच तिची प्रसूती झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. दुर्दैवाने प्रसूतीनंतर अवघ्या काही वेळातच बाळ दगावले. एकीकडे सुरक्षित मातृत्वासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न होत असले, तरी दुसरीकडे जिल्ह्यात आरोग्यसेवा वेळेवर न मिळाल्याने महिलेची प्रसूती बसमध्ये झाल्याची घटना घडली.

हिवरापाडी (ता. बीड) येथील वर्षा देवकते या दोन दिवसांपूर्वी बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. मात्र प्रसूतीसाठी आठ-दहा दिवसांचा अवधी सांगत देवकते यांना गुरुवारी (ता. 14) रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. पण आज सकाळी त्यांना प्रसूती कळा जाणवू लागल्या. बसमधून बीडकडे नेण्यात येत असताना वाटेतच त्यांच्या पोटात जास्त दुखू लागले. हे पाहून चालकाने बस थांबवून जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला दूरध्वनी केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कासट यांनी तत्काळ दखल घेत जरूड फाट्यापासून जवळच असलेल्या नाळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून तीन डॉक्‍टरांचे पथक गर्भवती महिलेच्या उपचारासाठी पाठविले. मात्र तोपर्यंत बसमध्येच महिलेची प्रसूती झाली.

बसमधील महिला प्रवाशांनी प्रसूतिसाठी मदत केली. यानंतर बाळाला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. बालरोगतज्ज्ञ डॉ. बागलाने यांनी बाळाची तपासणी करून बाळाला मृत घोषित केले. वेळेवर आरोग्यसेवा न मिळाल्यानेच बाळाचा मृत्यू झाला असल्याची शक्‍यत वर्तविण्यात येत आहे.

Web Title: women delivery in bus