esakal | महिलांच्या सन्मानासाठी इथं पुरूष उतरणार रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

महिलांच्या सन्मानासाठी इथं पुरूष उतरणार रस्त्यावर

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : महिलांच्या प्रश्नांसाठी महिलाच एकत्रितपणे झगडताना दिसतात. त्यात पुरुषांचा फारसा सहभाग नसतो. पण, लातुरात एक आगळीवेगळी फेरी निघणार आहे, ज्यात शेकडो पुरूषांचा सहभाग असणार आहे. महिलांचा सन्मान करा, असा संदेश या फेरीतून दिला जाणार आहे. यासाठी लातूरातील भारतीय स्त्री शक्ती संघटनेने पुढाकार घेतला आहे.

महिलांवर अॅसिड टाकणे, महिलांवर पेट्रोल टाकून जाळणे, त्यांच्यावर अत्याचार करणे असे प्रकार गेल्या काही महिन्यांत वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर, महिला दिनाचे औचित्य साधून महिलांकडे माणूस म्हणून पहायला शिकले पाहीजे, हा संदेश देण्यासाठी ही आगळी-वेगळी फेरी आयोजित करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

क्रीडा संकुलापासून रविवारी (ता. ८) सकाळी साडेआठ वाजता या फेरीला सुरवात होणार आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक आणि तिथून राजस्थान शाळा या मार्गावर ती निघेल. त्यानंतर शाळेच्या मैदानावर स्त्री सन्मानावर आधारित पुरूषांकडून संयम गीत आणि प्रतिज्ञा सादर केली जाणार आहे.

या उपक्रमात पालकमंत्री अमित देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, खासदार सुधाकर श्रृगांरे, माजी खासदार गोपाळराव पाटील, डॉ. अशोक कुकडे, कुमुदिनी भार्गव, डॉ. ज्योत्स्ना कुकडे, अर्चना सोमाणी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. शहरातील वेगवेगळ्या संघटनांनी या अनोख्या उपक्रमाला पाठींबा दिला आहे.

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

यासंदर्भात भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या उपाध्यक्ष उमा व्यास म्हणाल्या, स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान आणि त्यामुळे तिच्यावर होणारे अत्याचार याविषयी आपल्याला जाणीव आहेच. यासाठी स्त्रिया संघर्षात्मक लढा देतात. परंतु यासंदर्भात पुरुषांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. त्यांनी आपल्या जाणिवा जागृत केल्या आणि स्त्री अत्याचारावर प्रखर आवाज उठवला तर सामाजिक परिस्थितीत निश्चितच फरक पडेल. हे लक्षात घेऊन ही फेरी आम्ही काढत आहोत. सामाजिक भान असलेले, विविध संघटनांमधील पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी होणार आहेत.

loading image