महिलेकडे सापडले गावठी पिस्तूल!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

औरंगाबाद - न्यायनगर भागात किरायाने राहणाऱ्या महिलेच्या घरात गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सापडल्याचा प्रकार उघड झाला आहे. सदरील महिलेला सोमवारी (ता. २८) अटक करण्यात आली असून, मोक्कातील संशयित आरोपीची ती मानलेली पत्नी असल्याचे गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले.

ज्योती कडूबा अहिरे ऊर्फ सायरा शेख (वय ३५, रा. न्यायनगर) असे संशयित महिलेचे नाव आहे. गंभीर गुन्ह्यासाठी ज्योती ऊर्फ सायरा शेख हिच्या घरात पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे व उपनिरीक्षक योगेश धोंडे यांना मिळाली. त्यांनी याबाबत पडताळणी करून न्यायनगर येथील महिलेच्या घरात छापा टाकून दोन जिवंत काडतुसे आणि पिस्तूल जप्त केले. 

अधिक चौकशीअंती ती मोक्काअंर्तगत दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी शहजाद शमीम शेख (रा. आझमगड/मुंबई/औरंगाबाद) याची मानलेली पत्नी असल्याचे समोर आले आहे, असे गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले. तिच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून अटक करण्यात आले आहे. ही कारवाई घनश्‍याम सोनवणे, योगेश धोंडे, संतोष सोनवणे, सुभाष शेवाळे, सतीश हंबरडे, सुधाकर राठोड, विजयानंद गवळी, सय्यद अशरफ, सिद्धार्थ थोरात, नितीन धुळे, विकास गायकवाड, आनंद वाव्हुळ, रेखा चांदे, शेख सुलताना, काकासाहेब पंडित, नाना फंदे यांनी केली.

Web Title: women Pistol found by woman