मुलांसह विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

जिंतूर (जि. परभणी) - जिंतूरमधील एका महिलेने दोन मुलांसह पडीक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नंदा इंगोले (वय 26) असे या महिलेचे नाव आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. दळण आणण्यासाठी नंदा या मुलांसह घरातून बाहेर पडल्या. त्या सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने पतीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रात्री उशिरा विहिरीजवळ महिला व दोन मुलांच्या चपला आढळून आल्या. याची माहिती समजताच पोलिसांनी विहिरीतील पाणी उपसून तिघांचे मृतदेह बाहेर काढले.
Web Title: women suicide in well