महिला खेळाडूंसाठी सरसावल्या महिला, उभारले संघटन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

औरंगाबादेतील विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांनी "डिव्हायडेड बाय प्रोफेशन ऍण्ड युनायटेड बाय पॅशन' या उक्तीनुसार एकत्र येत 'असोसिएशन फॉर वुमन इन स्पोर्ट' या संघटनेची स्थापना शुक्रवारी (ता. 19) करण्यात आली आहे. 

औरंगाबाद - खेळात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांना हक्‍काच्या व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे. औरंगाबादेतील विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांनी "डिव्हायडेड बाय प्रोफेशन ऍण्ड युनायटेड बाय पॅशन' या उक्तीनुसार एकत्र येत 'असोसिएशन फॉर वुमन इन स्पोर्ट' या संघटनेची स्थापना शुक्रवारी (ता. 19) करण्यात आली आहे. 

संघटनेच्या अध्यक्षपदी मीनल भोगले, तर सचिवपदी डॉ. केजल भारसाखळे यांची निवड करण्यात आली आहे. मुली आणि महिला क्रीडा क्षेत्रात याव्यात यासाठी महिला खेळाडूंसाठी संघटना तयार झाली. या संघटनेच्या माध्यमातून गरजू महिला आणि बालिका खेळाडूंना आर्थिक साहाय्य करून देण्यासाठी या संघटनेच्या महिला पदाधिकारी कायम तत्पर राहतील.

खेळावरील प्रेम वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजनही या संघटनेच्या माध्यमातून भविष्यात करण्यात येणार असल्याचे असोसिएशन फॉर वुमन इन स्पोर्टच्या अध्यक्ष भोगले यांनी सांगितले. उर्वरित कार्यकारिणीत कार्यकारी अध्यक्षपदी अपर्णा कक्‍कड, उपाध्यक्षपदी मनेका देशपांडे, सहसचिवपदी नमिता दुग्गल, सहकोषाध्यक्षपदी प्रा. देवयानी तोतला, प्राजक्ता बिर्ला यांचा समावेश आहे. 
  
महिलांनो, मैदानाकडे चला... 
खेळाबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करताना कार्याध्यक्षा डॉ. अपर्णा कक्कड म्हणाल्या, व्यापामुळे मैदानावर फार वेळ घालवणे शक्‍य नसल्यास त्यांनी त्यांच्या मुलींना मैदानावर पाठविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, यासाठी काम करणार असल्याचे डॉ. भारसाखळे यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women's Players Association in Aurangabad