बीड : धनंजय मुंडेंविरोधात महिलांनी काढले मूक मोर्चे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

विडा (ता.केज) येथील एका सभेत भाषणावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बीड : परळी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल भाषणावेळी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. 20) बीड जिल्ह्यांत विविध ठिकाणी महिलांचे मूक मोर्चे निघाले. आष्टी, शिरूर, परळीत महिलांनी एकत्र येत काळ्या फिती लावून निषेध केला.  

विडा (ता.केज) येथील एका सभेत भाषणावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. या वक्तव्याच्या निषेधार्थ आष्टीत भाजप आमदार सुरेश धस यांनी भव्य मोर्चा काढला. तसेच परळीतही मोर्चा काढण्यात आला होता. 

- एकदा शब्द टाकला असता तर मतदारसंघ सोडला असता : धनंजय मुंडे (Video)

तत्पूर्वी, पंकजा आणि माझ्यामध्ये अनेकवेळा शब्दयुद्ध रंगले होते. माझ्यावरही अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली. आम्ही विचारांमुळे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहोत. मी नाते मानणारा माणूस आहे. मात्र आमच्या बहीण-भावाच्या नात्यात काहीजण विष कालवण्याचं काम करीत आहेत.

- महान भारत केसरी दादू चाैगुले यांचे निधन

जर मला पंकजा एकदा बोलल्या असत्या तर मी मतदारसंघ सोडला असता. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण होणार असेल, तर मला राजकारण करण्याची इच्छा नाही, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

- जेलमधील आमदार कदमांना पोलिस घेऊन गेले फ्लॅटवर; वाचा पुढे काय घडले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womens silent front against NCP leader Dhananjay Munde in Beed District