कंत्राटी वीज कामगारांचे आजपासून काम बंद आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

औरंगाबाद - महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या कंपनीतील राज्यभरातील 32 हजार कंत्राटी कामगार प्रलंबित विविध मागण्यांसाठी सोमवारपासून (ता.22) बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. यामुळे राज्यात विजेच्या समस्या गंभीर बनण्याची शक्‍यता आहे. 

वीज कंत्राटी कामगार संघाच्या तिसऱ्या अधिवेशनात कंत्राटी कामगार कायम होईपर्यंत पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील रोजंदारी कामगार पद्धती पुन्हा राबवावी, असा ठराव झाला होता. यावर निर्णय घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्कालीन प्रधान ऊर्जा सचिव मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली वीज उद्योगातील काही प्रमुख संघटनांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन केली होती. मनोज रानडे कार्यकारी संचालक महानिर्मिती यांनी या बाबतचा सकारात्मक अहवाल ऊर्जा विभागाला दिला आहे. रानडे समिती मधील सर्व सदस्यांचे रोजंदारी कामगार पद्धतीवर एकमत झाले असून, आता शासना कडून आर्थिक बोजाचे कारण देत या विषयी टाळाटाळ करण्यात येत आहे. यामुळे तिन्ही कंपनींतील कामगारांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. रानडे समितीचे ज्येष्ठ सदस्य मोहन शर्मा, अण्णाजी देसाई यांच्यातर्फे संघटनेतील तांत्रिक कामगार या आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

Web Title: Work Stop Agitation From Contract Labor Workers From today