esakal | भाजप,'महाविकास'चे कार्यकर्ते आमने-सामने;दुकान बंद न केल्याने वाद | Maharashtra Bandh In Jalna
sakal

बोलून बातमी शोधा

BJP, Mahavikas Aghadi's Workers Stand Before Over Maharashtra Bandh

भाजप,'महाविकास'चे कार्यकर्ते आमने-सामने;दुकान बंद न केल्याने वाद

sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी ( ता.११ ) राज्यभरात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे बंद पाळण्यात येत आहे. भोकरदन शहरात याला संमिश्र प्रतिसाद मिळत (Maharashtra Band) असतांना भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने दुकान बंद करण्यास नकार दिल्याने महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. यामुळे शहरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर (UP Lakhimpur Kheri Violence) घटनेच्या निषेधार्थ शहरात सोमवारी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने सकाळपासून बंद पाळण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (Nationalist Congress Party) आणि काँग्रेसच्या (Congress Party) पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर पायी फेरी काढण्यात आली होती.

हेही वाचा: औरंगाबाद बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंदला असहकार, व्यवहार सुरुच

या दरम्यान सिल्लोड मुख्य रस्त्यावरील भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दीपक जाधव यांचे दुकान सुरू असल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दुकान बंद करावी म्हणून त्याच्या दुकानासमोर गोंधळ घालत ठिय्या मांडला. मात्र, तरीही त्यांनी दुकान बंद करण्यास नकार दिल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दुकानासमोर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. हा गोंधळ सुरू असतांना त्या ठिकाणी शहरातील अनेक भाजप कार्यकर्ते जमा झाले व त्यांनी जाधव यांना समर्थन दर्शवले. त्यामुळे भाजपा व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दोनही बाजूने एकमेकांच्या नेत्या व पक्षांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असल्याने काहीकाळ मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र वेळीच पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने वाद निवळला.

loading image
go to top