बॅंकांचे कामकाज नवीन वेळेनुसार

प्रकाश बनकर
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

 प्रत्येक ग्राहकांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. त्याप्रमाणे त्यांना बॅंकेच्या सुविधा उपलब्ध असाव्यात, या उद्देशाने बॅंकांच्या वेळांचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात रहिवासी क्षेत्र, व्यापारी क्षेत्र आणि इतर क्षेत्र असे तीन पर्याय देण्यात आले होते; परंतु बॅंकांनी प्रत्येक शाखांचे वर्गीकरण आपल्या सोयीनुसार करून घेतले आहे.

औरंगाबाद: शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना नवीन वेळा निश्‍चित करण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे बॅंकांचे कामकाज जिल्हाभरात शुक्रवारपासून (ता. एक) सुरू झाले आहे.

 प्रत्येक ग्राहकांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. त्याप्रमाणे त्यांना बॅंकेच्या सुविधा उपलब्ध असाव्यात, या उद्देशाने बॅंकांच्या वेळांचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात रहिवासी क्षेत्र, व्यापारी क्षेत्र आणि इतर क्षेत्र असे तीन पर्याय देण्यात आले होते; परंतु बॅंकांनी प्रत्येक शाखांचे वर्गीकरण आपल्या सोयीनुसार करून घेतले आहे.

देशातील सर्वांत मोठी बॅंक एसबीआय जिल्ह्यातील सर्व शाखांचे वर्गीकरण हे इतर क्षेत्रांत ठेवले आहे. म्हणजे 10 ते 5 या वेळेत त्यांच्या सर्व शाखा सुरू असणार आहेत. बॅंक ऑफ महाराष्ट्र, बडोदा बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, सेंट्रल बॅंक या प्रमुख बॅंकांनीसुद्धा आपल्या सोयीनुसारच सर्व शाखांचे वर्गीकरण केले आहे. त्यामुळे हा निर्णय ग्राहकांसाठी घेतला गेला की, बॅंक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

बॅंकांच्या बदललेल्या वेळांवर पुनर्विचार करा : तुळजापूरकर 
 बॅंकांच्या वेळेत झालेल्या बदलामुळे ग्राहकांच्या अडचणी वाढल्या आहेत. यामुळे बॅंकांच्या बदलेल्या वेळेवर पुनर्विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लाईज फेडरेशनचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे. त्यांनी पत्रकात म्हटले, 31 ऑक्‍टोबरपासून व्यवसाय सहज होण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार बॅंकांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे; मात्र यामुळे बॅंकिंग व्यवस्थेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. आता निवासी, व्यावसायिक आणि अधिकारिक बॅंकांच्या वेळ अनुक्रमे सकाळी 9, 10 आणि 11 अशी केली आहे. मुळात व्यवहारासाठी ग्राहकांच्या सोयीचा कोणताच विचार करण्यात आलेला नाही. यामुळे ग्राहकांना गैरसोयीला समोरे जावे लागत आहे. बॅंकांच्या बदललेल्या वेळेची माहिती सूचना पत्रकावर लावणे गरजेचे असताना अजूनही कुठलीच सूचना ग्राहकांना देण्यात आलेली नाही. ग्राहकांच्या या गैरसोयीची दखल घेत वेळ बदल्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही श्री. तुळजापूरकर यांनी केली आहे. 

बॅंक शाखा व क्षेत्र वेळ 
एसबीआय जिल्ह्यातील सर्व शाखा इतर क्षेत्र  10 ते 5 
सेंट्रल बॅंक जिल्ह्यातील सर्व शाखा इतर क्षेत्र 10 ते 5 
इंडियन बॅंक समर्थनगर शाखा इतर क्षेत्र 10 ते 5
बॅंक ऑफ इंडिया गारखेडा शाखा रहिवासी क्षेत्र 9 ते 4 
बॅंक ऑफ महाराष्ट्र शहरातील सर्व शाखा व्यापारी क्षेत्र  11 ते 6
बॅंक ऑफ महाराष्ट्र विद्यापीठ शाखा रहिवासी क्षेत्र  9 ते 4
अलाहाबाद बॅंक औरंगाबाद शाखा व्यापारी क्षेत्र  11 ते 6
बॅंक ऑफ बडोदा औरंगाबाद सर्व शाखा इतर क्षेत्र 10 ते 5 
कॅनरा बॅंक औरंगाबाद सर्व शाखा व्यापारी क्षेत्र  11 ते 6
युनियन बॅंक ऑफ इंडिया औरंगाबाद सर्व शाखा व्यापारी क्षेत्र   11 ते 6
सिंडिकेट बॅंक औरंगाबाद सर्व शाखा इतर क्षेत्र 10 ते 5 
युनायटेड बॅंक औरंगाबाद शाखा व्यापारी क्षेत्र  11 ते 6 
इंडियन ओव्हरसीज बॅंक औरंगाबाद शाखा व्यापारी क्षेत्र 11 ते 6 
ओरिएंटल बॅंक कॉम. सावरकर चौक शाखा व्यापारी क्षेत्र  11 ते 6
ओरिएंटल बॅंक कॉम. सूतगिरणी चौक शाखा रहिवासी क्षेत्र 9 ते 4 
पीएनबी औरंगाबाद सर्व शाखा इतर क्षेत्र 10 ते 5 
युको बॅंक औरंगाबाद सर्व शाखा इतर क्षेत्र  -10 ते 5
अलाहाबाद बॅंक वाळूज शाखा रहिवासी क्षेत्र
 
9 ते 6 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The working of the banks according to the new timing