संस्कृतज्ज्ञ डॉ. अजित देव यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड सन्मान

औरंगाबाद : इंदूर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या विशेष सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना डॉ. अजित देव.
औरंगाबाद : इंदूर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या विशेष सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना डॉ. अजित देव.

औरंगाबाद : येथील संस्कृतज्ज्ञ डॉ. अजित अशोक देव यांना वेदसंशोधन कार्यासाठी "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' (युनायटेड किंगडम) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंदूर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या विशेष सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला. 

युनेस्कोने वेदांना जागतिक वारशाचा दर्जा दिला असून, वेद हे जगातील सर्वांत प्राचीन साहित्य मानले जाते. इ.स.पूर्व 5000 वर्षांपासून मौखिक परंपरा लाभलेल्या वेदांमध्ये आतापर्यंत वर्णमात्रेचेही परिवर्तन झालेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे वेदांचे पठण करण्याची अष्टविकृती पद्धती होय. वेदांच्या संहिताचे आज पुस्तक उपलब्ध आहे; परंतु अष्टविकृती या पुस्तक स्वरूपात उपलब्ध नाहीत. 

डॉ. देव यांनी जटा, माला, शिखा, रेखा, दंड, पद, क्रम आणि घन या अष्टविकृतीवर संशोधन केले असून, अष्टविकृती समुच्चय निर्माण करून भारतातील विविध संस्थांना त्याचे निःशुल्क वितरण करून वेदसंवर्धनाचे कार्य केले आहे. या संशोधन कार्यामुळे पुढच्या अनेक पिढ्या अष्टविकृतीच्या माध्यमातून वेदांचे संवर्धन व जतन करू शकतील. 

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ही जागतिक संस्था 20 वर्षांपासून जगातील 70 देशांमध्ये कार्यरत असून, संस्थेद्वारे विविध क्षेत्रांतील सर्वोत्कृष्ट कार्याची नोंद घेतली जाते. यापूर्वी वेदांच्या इतर संशोधनासाठी डॉ. अजित देव यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, भारताचे राजदूत जयंत खोब्रागडे यांच्या हस्ते "इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम ऍवॉर्ड (रशिया)' प्राप्त झाले असून, चारही पीठांचे शंकराचार्य; तसेच परमपूज्य गोविंददेव गिरी महाराज यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. 

डॉ. देव यांच्या या यशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, संस्कृत विभागप्रमुख डॉ. क्रांती व्यवहारे, स्टेपिंग स्टोन शाळेच्या अध्यक्षा नसीम रहिम, प्राचार्य डॉ. डिक्रुज, डॉ. अजय निलंगेकर, डॉ. पंकजा वाघमारे, डॉ. मंजूषा कुलकर्णी आदींनी अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com