जागतिक बौद्ध धम्म परिषदेची तयारी जोरात : Video

योगेश पायघन
Tuesday, 19 November 2019

  • धम्मगुरु दलाई लामा यांची धम्मदेसना
  • बुद्ध तत्त्वज्ञानावर चित्र प्रदर्शन 
  • शाहिरी जलशासह विविध कार्यक्रम 

औरंगाबाद : पीईएस क्रीडा संकुलावर ता. 22 ते 24 नोव्हेंबरदरम्यान जागतिक धम्म परिषद होत आहे. धम्मगुरु दलाई लामा यांची धम्मदेसना हे या परिषदेचे मुख्य आकर्षण आहे. सभामंडप, बिछायत नियोजनबद्ध बैठकव्यवस्थेची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

यानिमित्त शहरातील 20 चित्रकार एकत्र येऊन गुरुवारपासून (ताय 21) बुद्ध तत्त्वज्ञानावर चित्र प्रदर्शन भरविणार असल्याची माहिती मालती आर्ट गॅलरीचे कार्यवाहक नंदकुमार जोगदंड यांनी दिली.

जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे औचित्य साधून मालती आर्ट गॅलरीमध्ये 20 चित्रकारांचे 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्‌घाटन कर्करोग रूग्णालयाचे विषेश कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेत बुद्ध तत्वज्ञानवर अधारित चित्र काढण्यात येत आहेत.

अरे बापरे - उस्मानाबादेत चार तालुके हादरले

प्रा. विवेक लाड, रमेश औंधकर, डॉ. मेधा पाध्ये, नंदकुमार जोगदंड, प्रा. निखील राजवर्धन, सचिन करणकाळे, गणेश गुळे, हर्षद खांदारे, सोपान करवंदे, ज्योती बोबडे, प्राचार्य रविंद्र तोरवणे, बाबा जगताप, ज्योती बोदडे, अनिता स्वामी, आशा बोंबडे, कैलास मगरे, कैलास खानजोडे आणि प्रा. मनिषा सानप हे सर्व चित्रकार चित्र काढत आहेत. त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन गुरुवारपासून खुले राहणार असल्याचे श्री. जोगदंड यांनी सांगितले. 

कसं शक्य आहे वाचा - पपईने बनवले लखपती

शाहीर संभाजी भगत यांचे शहरात जनजागृतीसाठी आयोजित जलशानिमीत्त आगमन झाले. मंगळवारी एकता नगर व आंबेडकर नगरात कार्यक्रम झाले. पुढील दोन दिवस बुधवारी मुकुंदवाडी संजयनगर व फुलेनगर येथे तर गुरवारी नंदनवन कॉलनी व जयभीमनगर येथे जलशाचे आयोजन करण्यात आले आहे. 

भव्य शामियाने अन्‌ सजावट 

पीईएसच्या मैदानावर धम्मगुरु दलाई लामा यांची धम्मदेसना हे या परिषदेचे मुख्य आकर्षण आहे. विविध देशातून उपासक उपासिका शहरात यायला सुरुवात झाली आहे. स्वयंसेवक रात्रंदिवस नियोजनासाठी नेमून दिलेल्या समितीनिहाय कामे करीत आहेत. हे सर्व नियोजन संयोजक डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ. अरविंद गायकवाड यांच्या निगराणीत सुरु आहे. कार्यक्रमासाठी मोठे सभामंडप, बिछायत नियोजनबद्ध बैठक व्यवस्थेची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Buddhist Summit in Aurangabad