World No Tobacco Day: विद्यार्थ्यांची पोस्टरद्वारे व्यसनविरोधी जनजागृती

प्राथमिक शाळा बारसवाडा येथील विद्यार्थ्यांनी धुम्रपानाचे दुष्परिणाम सांगणारे चित्र काढले
no tobacco day
no tobacco dayno tobacco day

वडीगोद्री (जालना): जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिना निमित्त (world no tobacco day) जि.प.प्रा.शा.बारसवाडा (ता.अंबड) येथे सोमवारी (ता ३१ ) रोजी विद्यार्थ्यांनी पोस्टरद्वारे व्यसनविरोधी जनजागृती केली.

प्राथमिक शाळा बारसवाडा येथील विद्यार्थ्यांनी धुम्रपानाचे दुष्परिणाम सांगणारे चित्र काढले. काढलेले चित्र हातात धरून व्यसनविरोधी संदेश देत ते चित्र सोशल मीडियावर शेअर केले. सध्या कोरोना महामारी चालू आहे. धुम्रपान करून व तंबाखू खाऊन ठिकठिकाणी थुंकल्याने कोरोना प्रसार होत आहे.

no tobacco day
जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठ्याची फोटोंमधून करा सैर

व्यसनाविषयी जनजागृती करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्रीधर यशवंतराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरती मोढेकर, गायञी घोडके, ज्ञानेश्वरी घोडके, प्रतिक्षा शेंडगे, करण घायाळ, कृष्णा मुळक ,रोहीणी मुळक यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला. या उपक्रमाबद्दल डोणगाव केंद्रप्रमुख रमेश फटाले, मुख्याध्यापक सुभाष चाटे,अशोक घाडगे, सलाम मुंबई फाऊंडेशनचे सतिश वानखेडे, निर्माण विकास संस्थेचे विजय बनसोडे, अनुप मोरे, सुरेश नंदबन्सी,अर्जुन खोंडे,लहू गोल्हार यांनी अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com