तंबाखू खाणाऱ्या अकरा टक्क्यांना गंभीर लक्षणे

जागतिक तंबाखू विरोधी दिनी तपासणी शिबिरातील धक्कादायक चित्र
screening camp
screening campSakal

लातूर - चालू वर्षात जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी तंबाखूविरोधी लढा सुरू केला असून त्याची सुरूवात त्यांनी जागतिक तंबाखू विरोधी दिवसांपासून केली आहे. त्यांच्या या संकल्पनेतून मंगळवारी (ता. ३१) जिल्ह्यातील उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात तंबाखू खाण्याचे व्यसन असलेल्यांच्या मौखिक तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यातून धक्कादायक चित्र समोर आले आहे. एका दिवसात तपासणी केलेल्या दहा हजार जणांपैकी तब्बल अकराशे जणांना गंभीर लक्षणे आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तंबाखू, गुटखा, तंबाखूमिश्रित सुपारी खाणे तसेच सिगारेट व नस ओढण्याचे अनेकांना व्यसन आहे. या व्यसनाचे दुष्परिणाम माहित असूनही व्यसनाच्या आहारी गेलेले लोक `आपल्याला काहीच होत नाही`, या मानसकितेतून प्राथमिक लक्षणे दिसूनही उपचाराकडे दुर्लक्ष करत आहेत. शेवटच्या क्षणी त्यांना जाणीव होते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. यामुळेच योग्यवेळी तपासणी व उपचारातून लोकांच्या व्यसनाधिनतेला आवर घालण्याची गरज लक्षात घेऊन श्री. गोयल यांनी तपासणी शिबीराचा उपक्रम हाती घेतला आहे. पहिल्यांदाच होत असलेल्या या शिबीरांसाठी आशा कार्यकर्तींच्या माध्यमातून तंबाखू, गुटखा, सिगारेटचे व्यसन असलेल्यांना बोलावण्यात आले.

शिबिराला मोठा प्रतिसाद मिळणार नसल्याचे सुरवातीला वाटत होते. मात्र, मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबीराला हजेरी लावली. जवळच्या ठिकाणी शिबिर असल्यामुळे सर्वांची सोय झाली. शिबिरानंतर मात्र, धक्कादायक चित्र समोर येऊ लागले. ग्रामीण भागात तंबाखूचे व्यसन असलेल्यांना मोठ्या प्रमाणात गंभीर लक्षणे दिसून आली. शहरी भागात हे प्रमाण कमी दिसून आले. मंगळवारी दहा हजार १३२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार १३९ जणांना गंभीर लक्षणे आढळून आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले. यातून तंबाखू व अन्य व्यसन असलेल्यांपैकी अकरा टक्के लोकांना गंभीर लक्षणे असल्याचेही डॉ. वडगावे यांनी स्पष्ट केले.

तपासणीत आढळलेली लक्षणे

  • तोंड पूर्णतः न उघडणे.

  • तोंडात पांढरे व लालसर चट्टे होणे.

  • जिभेला व तोंडात विविध ठिकाणी गाठी येणे

  • मानेला गाठी येणे

  • तोंडात न भरून येणाऱ्या न दुखणाऱ्या जखमा होणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com