‘कुस्ती पंढरी’ चालवतेय ‘रुस्तुम-ए-हिंद’चा वारसा!

- संतोष डांगे
बुधवार, 11 जानेवारी 2017

रामलिंग मुदगडने घडविले अनेक मल्ल, आज साजरा होणार विजय दिन

कासारशिरसी - रुस्तुम-ए-हिंद (कै.) पहिलवान हरिश्‍चंद्र बिराजदार यांचे जन्मगाव असलेले आणि ‘कुस्ती पंढरी’ म्हणून ओळखले जाणारे रामलिंग मुदगड (ता. निलंगा) कुस्तीचा वारसा समर्थपणे चालवीत आहे. या गावाने अनेक मल्ल घडवून राज्यात व देशात नावलौकिक वाढविला आहे. बुधवारी (ता. ११) बेळगाव कुस्तीतील विजय दिनानिमित्त गावात कुस्ती स्पर्धा होणार आहेत; तसेच विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, करिअरविषयक मार्गदर्शन होईल. 

जिल्ह्यातील रामलिंग मुदगड येथे रुस्तुम-ए-हिंद (कै.) पहिलवान हरिश्‍चंद्र बिराजदार यांचा जन्म झाला. घरातील कुस्तीच्या वारशामुळे बिराजदार यांनी कुस्ती क्षेत्रातील सर्व किताब जिंकले व ते ऑलिंपिकलाही गेले.

महाराष्ट्र केसरी ते ऑलिंपिक मल्ल असा त्यांचा प्रवास राहिला. बेळगाव (कर्नाटक) येथे ता. ११ जानेवारी १९७७ रोजी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पंजाबचा मल्ल सत्पाल सिंग व रामलिंग मुदगडचा (महाराष्ट्र) मल्ल हरिश्‍चंद्र बिराजदार यांची अंतिम लढत झाली.

यात १७ मिनिटे कुस्ती चालली. यात सत्पाल सिंग यांना हरिश्‍चंद्र बिराजदार यांनी चितपट करून देशात महाराष्ट्राची शान वाढविली. याबद्दल बेळगाव शहरात पहिलवान हरिश्‍चंद्र बिराजदार यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. ही भव्य मिरवणूक दुसऱ्या दिवशी संपली होती. ता. १४ सप्टेंबर २०११ रोजी हरिश्‍चंद्र बिराजदार यांचे निधन झाले. संपूर्ण आयुष्य फक्त कुस्तीसाठी वाहिलेले रुस्तुम-ए-हिंद (कै.) पहिलवान हरिश्‍चंद्र बिराजदार आज आपल्यात नाहीत; पण ता. ११ जानेवारी १९७७ बेळगावच्या कुस्तीच्या विजयी दिनानिमित्त महाराष्ट्रातील मल्लांना त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ता. ११ जानेवारी हा दिवस रामलिंग मुदगड येथे कुस्तीचा विजयी दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. यानिमित्त स्पर्धांसह विविध कार्यक्रम होणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wrestling player in kusti pandhari