येवला : मकाच्या दराची तेजी १७२५ रुपयांपर्यंत ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada

येवला : मकाच्या दराची तेजी १७२५ रुपयांपर्यंत !

sakal_logo
By
संतोष विंचू - सकाळ वृतसेवा

येवला : शेतकऱ्यांचा मका विक्रीला येत असतानाच बाजारभावही तेजीत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मकाचे बाजारभाव १२२५ ते १७२५ तर सरासरी १६०० रूपे प्रति क्विंटल पर्यंत होते. सप्ताहात येवला व आंदरसूल आवारात कांद्याच्या दरातील घट शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ठरत आहे.

शेतकऱ्यांनी खरिपातील मका काढून विक्रीसाठी आणत आहेत. शासकीय हमीभावाची खरेदी १ हजार ८७० रुपयांनी होणार आहे. मात्र या खरेदीला सुरवात नसून त्यातही मोजक्या शेतकऱ्यांचीच खरेदी होते. त्यात खासगी बाजारातही यावर्षी मकाचे दर तेजीत असल्याने शेतकरी आपली मका विक्री करत आहेत. सप्ताहात येथे बाजार समितीत मकाची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. मकास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिली. आवक ३८ हजार ८१२ क्विंटल झाली तर बाजारभाव किमान १२२५ ते कमाल १७२५ तर सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. उपबाजार आंदरसूल येथे मक्याची आवक सहा हजार क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ११८५ ते कमाल १७२२ तर सरासरी १५६० रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते.

हेही वाचा: ठाणे : पहिल्याच दिवशी अडीच हजार नागरिकांचे लसीकरण

सप्ताहात उन्हाळ कांदा आवक टिकून राहिली तर बाजारभावात घसरण झाली. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आदी राज्यात व परदेशात मागणी सर्वसाधारण होती. अनेक शेतकऱ्यांचा कांदा अजून चाळीतच असून दरात घसरण होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. अनेक जण आता कांदा विक्रीलाही काढत आहेत. सप्ताहात येथे कांदा आवक २५ हजार २९४ क्विटल झाली असून बाजारभाव किमान ४५० ते कमाल २७९१ तर सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार आंदरसूल येथे कांद्याची आवक नऊ हजार क्विंटल झाली तर बाजारभाव ६०० ते २८१२ तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. सोयाबीनच्या दरात वाढ होत असताना आवकेत घट झाली. सोयबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिली.

हेही वाचा: 'गांधींनी भगत सिंगला का मरु दिलं, नेताजींची हत्या का झाली?'

सोयाबीनची आवक २५७ क्विंटल झाली असून बाजारभाव ३५०० ते पाच हजार ३७७ तर सरासरी पाच हजार २०० पर्यंत होते. गव्हाच्या आवकेत घट झाली तर गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. आवक ११० क्विंटल झाली असून बाजारभाव १६५१ ते २१५३ तर सरासरी १७५५ रुपयांपर्यंत होते. बाजरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर होते. बाजारभाव १५५० ते १६७६ तर सरासरी १६२५ रुपयांपर्यंत होते. हरबराला व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. बाजारभाव ३४९९ ते ४५०० तर सरासरी ४२८० रुपयापर्यंत होते. मुगाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर चार ते सहा हजार तर सरासरी पाच हजार ५१ रुपयापर्यंत होते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव के.आर. व्यापारे यांनी दिली.

loading image
go to top