ठाणे : पहिल्याच दिवशी अडीच हजार नागरिकांचे लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाणे : पहिल्याच दिवशी अडीच हजार नागरिकांचे लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे पालिका प्रशासनाकडून मोठा गाजावाजा करीत ११ लाखांचा टप्पा पार केल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र दुसरीकडे शहरातील पाच लाखांहून अधिक नागरिकांनी एकही डोस घेतला नसल्याची बाब समोर आली. त्यानंतर पालिका प्रशासनाने मंगळवारपासून हर घर दस्तक मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शहरातील अडीच हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे या मोहिमेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे महापालिका हद्दीतील गती प्राप्त व्हावी, तसेच नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे या उद्देशाने ९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ‘हर घर दस्तक’ ही मोहीम पालिकेच्या वतीने राबवण्यात येत आहे. त्यानुसार पालिकेचे कर्मचारी, आशा वर्कर, वॉर्डबॉय आदींसह डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन घरोघरी जाऊन लसीकरणाचा सर्व्हे करण्यासाठी १७० पथके तयार केली जाणार आहेत. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना तात्काळ त्याच ठिकाणी लस दिली जात आहे. त्यानुसार आता ठाणेकरांना घरबसल्या लस मिळत आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी आरोग्य केंद्रामार्फत तेथील कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरोघरी सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार पहिल्या दिवशी २५०० जणांचे लसीकरण करण्यात आल्याचा दावा उपायुक्त मनीष जोशी यांनी केला आहे.

हेही वाचा: कोल्हापूर : बाल आरोग्य तंदुरुस्तीचे आव्हान

महापौरांकडून जनजागृती
बुधवारी महापौर यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत कोपरीतील कान्हेवाडी परिसर, गांधीनगर, लेप्रसी कॉलनी या परिसरात घरोघरी भेटी दिल्या. या वेळी नागरिकांशी चर्चा करून त्यांच्यामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती केली.

loading image
go to top