हो, आमच्यावर निर्बंध घाला; क्लासेस संघटनेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

लातूर : शहरातील बहुतांश क्लासचे व्यापारीकरण झाले आहे. त्यामुळे ‘लातूर पॅटर्न’च धोक्यात आला आहे, असे कबूल करत आमच्यावर सरकारने आता निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे, असे खासगी काेचिंग क्लासेस संघटनेने बुधवारी स्पष्ट केले.

लातूर : शहरातील बहुतांश क्लासचे व्यापारीकरण झाले आहे. त्यामुळे ‘लातूर पॅटर्न’च धोक्यात आला आहे, असे कबूल करत आमच्यावर सरकारने आता निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे, असे खासगी काेचिंग क्लासेस संघटनेने बुधवारी स्पष्ट केले.

'स्टेप बाय स्टेप' क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या खून प्रकरणामुळे शहरातील क्लासमध्ये चालू असलेले गैरप्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, 'क्लासेसला हवाय नियमांचा धडा' असे वृत्त ‘सकाळ’मध्ये बुधवारच्या अंकात प्रसिद्ध झाले. याची दखल घेत ‘आम्हाला योग्य त्या निर्बंधाची आवश्यकता आहे’, असे संघटनेने स्पष्ट केले. त्याच वेळी हे निर्बंध अन्यायकारक असू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

इतर राज्यातून आलेल्या आणि शिक्षणाचे बाजारीकरण करू पाहणाऱ्या काही क्लास संचालकांमुळे 'लातूर पॅटर्न' धोक्यात अाला आहे. खरंतर गेली अनेक वर्षे शिक्षणाच्या क्षेत्रात ‘लातूर पटर्न’ चर्चेत आहे. यामुळे अनेक विद्यार्थी घडले अाहेत. या ‘लातूर पॅटर्न’बाबत गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी नियमांची अावश्‍यकता आहे. सरकारने याबाबत कायदा करायला हवा. तरच क्लासचालकांना शिस्त लागेल. यावर आमचा विश्‍वास आहे;  पण हे नियम करताना सुशिक्षीत बेरोजगार असलेल्या लहान क्लास चालकांचा विचार व्हावा. त्यांच्या पोटावर पाय बसणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी, असे संघटनेचे अध्यक्ष विकास कदम आणि सचिव सतीश आकडे यांनी सांगितले.

बाहेरून आलेल्या प्राध्यापकांची ‘क्रेझ’ 
राज्याबाहेरून आलेल्या प्राध्यापकांची लातूरमधील विद्यार्थ्यांमध्ये ‘क्रेझ’ वाढत अाहे. असे शिक्षक शिकवण्यासाठी क्लासमध्ये आले की त्या क्लासमध्ये मुलांची गर्दी होऊ लागली आहे; पण मुलांनी आणि पालकांनी राज्याबाहेरून आलेले हे शिक्षक खरोखरीच गुणवत्ताधारक आहेत का, हे पाहावे, असे आवाहन कदम यांनी या वेळी केले.

Web Title: yes banned us said private class owners