बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला माजलगांव धरणात; घातपाताचा आरोप

young boys body found in Majalgaon dam case of assaulting
young boys body found in Majalgaon dam case of assaulting

माजलगांव : मागील दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह मंगळवारी (ता. 26) येथील धरणात आढळून आला. प्रशांत बाजीराव राठोड (वय 22, रा. लऊळ क्र. 1, ता. माजलगाव) असे या युवकाचे नाव आहे. घातपाताचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. 

प्रशांत राठोड हा बी. फार्मसी व्दितीय वर्षाला शिक्षण घेत होता. तालुक्यातील लवुळ क्रं. एक येथील प्रशांत राठोड हा रविवार (ता. 24) पासुन घरातून निघून गेला होता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला परंतू तो आढळून न आल्याने (ता. 24) रविवारी शहर पोलिसांत हरवला असल्याची तक्रार दाखल केली होती. येथील माजलगांव धरणाच्या पाणीपात्रात आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. तात्काळ घटनास्थळी पोलिस दाखल झाले तर नातेवाईकांना देखील कळविण्यात आले होते. मृतदेहाचा शवविच्छेदन येथील ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले.

औषधनिर्माता शास्त्र पदवीचे शिक्षण घेत असलेल्या प्रशांत राठोड यांचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाला नसून त्याचा घातपात झाला असल्याचा आरोप चुलतभाउ उदयभान राठोड यांनी केला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com