Success Story: कोरोनाच्या काळात शेतकऱ्याने फुलविली द्राक्षाची बाग, सात लाखांचे उत्पन्न मिळविले

बाबासाहेब गोंटे
Wednesday, 30 December 2020

द्राक्षबागेला ठिबक सिंचन व लोखंडी अँगल्सचा वापर करण्यात आला. पाण्याची मात्रा देण्यासाठी विहीर, कूपनलिका व शेततळे याचे पाण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

अंबड (जि.जालना) : अंबड तालुक्यातील भाटखेडा येथील शेतकरी रामनाथ कडुळे यांनी आपल्या शेतात सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करत पारंपरिक पिकाला थारा न देता भरघोष उत्पन्न मिळविण्यासाठी दोन एकरमध्ये द्राक्षाची वर्ष २०१८ मध्ये सरासरी दोन हजार खोड लागवड केले. दोन एकरमध्ये द्राक्षाची लागवड करताना नऊ बाय पाचवर अंतर केली. यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला. द्राक्षबागेला ठिबक सिंचन व लोखंडी अँगल्सचा वापर करण्यात आला. पाण्याची मात्रा देण्यासाठी विहीर, कूपनलिका व शेततळे याचे पाण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

 

 

 

 

जागतिक कोरोना महामारीचे संकट व लॉकडाऊनच्या काळात शेती व्यवसायात हार न मानता दिवसरात्र मोठ्या मेहनतीने द्राक्षाची फळबाग फुलवीत उत्पन्नाचे स्वप्न अंगी बाळगले होते. द्राक्ष बागेची दोन वर्षांपूर्वी लागवड करून या वर्षी द्राक्षातून दुसऱ्यांदा उत्पन्न मिळविताना त्यांची आगळी-वेगळी किमया अखेर फळाला आली आहे. दोन एकरमध्ये लावलेल्या द्राक्ष बागेसाठी खत, औषधी अंतर्गत मशागत, पाण्याची मात्रा यासह सव्वा लाख रुपये खर्च आला आहे. त्यांना द्राक्ष बागेतून सरासरी सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे शेतकरी रामनाथ कडुळे यांनी खर्च आणि उत्पन्नाचे गणित अखेर जुळविले आहे.

 

 

शेती व्यवसाय परवडत नाही. म्हणून दुर्लक्ष करून चालत नाही. तो आपला पारंपरिक वडिलोपार्जित व्यवसाय आहे. यामध्ये पीक पद्धतीत आगळी-वेगळी निवड करत उत्पन्नाचे स्वप्न अंगी बाळगत द्राक्ष बागेतून उत्पन्नाचे स्वप्न अखेर साकार केल्याचे मनापासून समाधान व आनंद आहे.
रामनाथ कडुळे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, भाटखेडा

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young Farmer Bloom Grapes, Get Seven Lakhs Income Ambad Jalna News