
- अनिल गाभुड
विहामाडवा - काही दिवसांपूर्वीच महसूलमंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी गांव, नकाशातील शेतरस्ते, वहीवाट मोकळ्या करण्यासंदर्भात सर्व जिल्हाधिकारी तथा तहसीलदारांना आदेशीत केलेले असून सुद्धा पैठणचे तहसीलदार तथा तालुक्यातील महसूल प्रशासन गांव नकाशातील शिव पानंद रस्ते, वहीवाट रस्ते मोकळे करण्यासंदर्भात गांभीर्याने दखल घेत नसुन परिणामी दुर्दैवाने आज (दि. ०६) नवगांव तालुका पैठण येथील एका युवक शेतकर्यांने आपल्या शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.