बीड क्राईम - तरुणाच्या तावडीतून मुलीची सुटका, आरोपीस पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 March 2020

केज (जि. बीड) -  तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. आपली मुलगी बेपत्ता झाल्याची वडिलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून केज पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून पीडित मुलीची स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुटका करून आश्रूबा बंडू सत्वधर (वय २२) यास न्यायालयासमोर हजर केले असता त्यास १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी शहरातील महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. ती २२ फेब्रुवारी रोजी रात्री घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या आई-वडीलांनी जवळच्या नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र ती कुठेच मिळून आली नाही. शेवटी तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यामुळे पोलिस नाईक बाळकृष्ण मुंडे यांनी तिच्या भ्रमणध्वनीवर आलेले कॉल डिटेक्ट करून तपास केला असता ती पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे असल्याचे निष्पन्न झाले. तपासकामी १४ मार्चला पोलिस नाईक बाळकृष्ण मुंडे व धनपाल लोखंडे यांनी भीमा कोरेगाव येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला. यावेळी एका खोलीत पीडित मुलगी व तरुण हे दोघे मिळून आले. त्या दोघांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणून मुलीचा जबाब घेतला.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

आरोपी आश्रूबा सत्वधर याने पीडित मुलगी ही शिक्षण घेण्यासाठी येत असताना तिच्यासोबत ओळख निर्माण केली. त्या ओळखीतून तिच्यासोबत प्रेम संबंध निर्माण करून तुझ्यासोबत लग्न करतो, असा विश्वास देऊन तिला पळून जाण्यासाठी प्रवृत्त केले. २२ फेब्रुवारीच्या रात्री पीडित मुलीला तिच्या गावातून एका दुचाकीवरून आणले. केजहून तिला भीमा कोरेगावला नेले. तेथे त्याने बेपत्ता झाल्यापासूनच्या कालावधीत त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला, असे पीडित मुलीने पोलिसात दिलेल्या जबाबात नमूद केले आहे. यावरून केज पोलिसात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक श्रीराम काळे हे पुढील तपास करत आहेत. यातील आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young girl rescued from youth