कोण पटकावील यंग इन्स्पिरेटर्स ॲवॉर्ड?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

औरंगाबाद - समाजात असे अनेक ध्येयवेडे तरुण आहेत, त्यांचे विविध क्षेत्रांत काम सुरू आहे. कुणी लोकांच्या सहकार्याने तर कुणी संघर्षातून आपले कार्य रेटत आहे. अशाच काही प्रेरणादायी तरुणांच्या कामाचे कौतुक व्हावे, यासाठी त्यांना ‘यंग इन्स्पिरेटर्स ॲवॉर्ड’ने सन्मानित करण्यात येणार आहे.

औरंगाबादेत ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे १०, ११ आणि १२ जूनदरम्यान ‘समर युथ समिट-२०१८’ होणार आहे. यासाठी औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद येथील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यादरम्यान, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यंगस्टर्सना ‘इन्स्पिरेटर्स ॲवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी वरील चारही जिल्ह्यांमधील युवकांनी आपले प्रस्ताव २२ एप्रिलपर्यंत ‘सकाळ’ कार्यालय, प्लॉट नं. ७, सिडको, एन-१, टाऊन सेंटर, जालना रोड, औरंगाबाद, पिनकोड-४३१००३ या पत्त्यावर पाठवावेत. याबाबत अधिक माहितीसाठी यिन समन्वयक आकाश गायकवाड (जालना ९९२२८५००४४), ऐश्‍वर्या शिंदे (औरंगाबाद ७०२८०२६४७७) यांच्याशी संपर्क साधावा.

काय आहेत निकष...
  १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणी प्रस्ताव पाठवू शकतात.
  शैक्षणिक यश, वैयक्‍तिक ध्येय आणि इतर कामगिरी.
  कोणत्या आव्हानांना पार केले, याची माहिती.
  तुमच्या नवसंकल्पना आणि समाजाला त्याचा काय फायदा झाला?
  बातम्यांची कात्रणे, पुरस्काराची माहिती व छायाचित्रे.

या विभागातील प्रस्ताव...
  समुदाय सेवा सामाजिक कार्य
  कला आणि संस्कृती
  क्रीडा शिक्षण 
  विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी
  युवक नेतृत्वातील उत्कृष्ट
  उद्योग - स्टार्टअप

Web Title: young inspectors award