बीड : कमी वेळात अधिक पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने बीडमधील एका तरुणाची २२ लाख रुपयांची फसवणूक झाली. फसवणुकीच्या तणावामुळे तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला..त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव सोहेल ऊर्फ पावेल खान (वय ३०, रा. शहेनशाहनगर, बीड) असे आहे. त्याने ओळखीतील चार जणांच्या सांगण्यावरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली होती..Lightning Strike: परळी वैजनाथमध्ये विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; पत्नी गंभीर जखमी.सुरवातीला १ लाख ८५ हजार रुपये, नंतर ३ लाख रुपये, आणि असे करत करत एकूण २२ लाख रुपये गुंतवले. मात्र, नफ्याचे आमिष तर दूरच, त्याला मूळ रक्कमही परत मिळाली नाही. पैसे परत मिळवण्यासाठी सोहेलने संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा केला, पण प्रतिसाद न मिळाल्याने त्याने बुधवारी (ता. ६) रात्री स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओत त्याने आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीबाबत माहिती दिली. त्यानंतर उंदीर मारण्याचे विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.