''चुलीत गेलं राजकारण अन् चुलीत गेला पक्ष''

youth aggressive on political situations in Beed
youth aggressive on political situations in Beed

वडवणी (जि. बीड) : मोर्चे, निदर्शने, रस्ता रोको, ठोक मोर्चा काढून प्रशासनासमोर तळ ठोकून असे एक ना अनेक प्रकराची आंदोलने केली. तरीही सरकार मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण भेटेपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा ठराव कुप्पा (ता. वडवणी) ग्रामस्थांनी घेतला आहे.'चुलीत गेलं राजकारण अन चुलीत गेला पक्ष' मराठा आरक्षण एकच लक्ष असा फलक गावात युवकांनी लावला आहे.

गावात राजकीय पुढारी आले आणि काही अनुचित प्रकार घडला तर तोच पुढारी जबाबदारी राहिल अशा प्रकारचे निवेदन गावकऱ्यांनी तहसीलदार व वडवणी पोलिस स्टेशनला दिले आहे. याबाबत ग्रामपंचायतीने ठरावदेखील घेतला आहे. यावेळी बाबासाहेब भारस्कळ, दशरत सावंत, प्रकाश सावंत. डॉ. प्रविण सावंत, शामसुंदर सावंत, बाळासाहेब सावंत, गनेश सावंत, अजय सावंत, महेशराव सावंत, बंडू सावंत, वसंत वडचकर, रंजित सावंत.हनुमान काळे, हनुमान सावंत, अक्षय सावंत, सुशिल सावंत, दादासाहेब सावंत, सचिन मायराने, जगन्नाथ सावंत, राहुल सावंत, राजेश सावंत, सुमित सावंत, दत्ता कदम, संजय सावंत, योगेश सावंत यांनी फ्लकाचे शनिवारी (ता. आठ) अनावरण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com