नांदेडमध्ये पुन्हा पीस्तुलधारी युवकास अटक 

प्रल्हाद कांबळे
रविवार, 22 मार्च 2020

युवकास श्रावस्तीनगर भागातून अटक केली. त्याच्याकडून एक एअर पीस्तुल, छर्रे आणि तलवार जप्त केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांनी शनिवारी (ता. २२) केली. 

नांदेड : परिसरात पिस्तुलचा व तलवारीचा धाक दाखविणाऱ्या युवकास श्रावस्तीनगर भागातून अटक केली. त्याच्याकडून एक एअर पीस्तुल, छर्रे आणि तलवार जप्त केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांनी शनिवारी (ता. २२) केली. 

शहरातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना दिल्या. तसेच स्थानिक पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनाही सांगण्यात आले. द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या पथकांतील सर्वच अधिकाऱ्यांना गस्त घालून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले. शनिवारी (ता. २१) सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती हे आपल्या पथकासह शहरात गस्त घालत होते. 

हेही वाचा -  गुन्हा मागे घे म्हणून खंजरने हल्ला

एअर पिस्तुल व तलवार जप्त

यावेळी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी श्रावस्तीनगर गाठले. तेथे गेल्यानंतर सार्वजनिक रस्त्यावर शेख जुबेर शेख सादीक (वय २८) रा. खुदबेनगर चौरस्ता देगलूरनाका हा हातात एअर पिस्तुल व तलवार घेऊन परिसरात दहशत पसरवित होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून विनापरवाना बेकायदेशीररित्या चार हजार रुपये किंमतीचे एअर पिस्तुल, २९ छर्रे आणि एक तलवार जप्त केली. आरोपीला अटक करुन त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री. गायकवाड करत आहेत. 

रस्ता अडवून एकाला लुटले

नांदेड : बसस्थानकावरून घराकडे परत जाणाऱ्या एका युवकाला रस्त्यात गाठून मारहाण करून त्याच्या जवळचे नगदी सहा हजार आणि एक मोबाईल असा १२ हजार ४०० रुपयाचा ऐवज जप्त केला. ही घटना शनिवारी (ता. २१) सायंकाळी घडली. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पीराजी बाबू मेटकर (वय २५) हा युवक आपल्या पाहूण्याला कंधार येथे जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकावर सोडण्यासाठी दुपारी आला होता. पाहूण्यला सोडून तो परत जात असतांना त्याला बसस्थानकाच्या काही अंतारव तुषार कांबळे, सुरज हाटकर आणि अरूण या तिघांनी अडविले. पिराजी मेटकर याला लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याच्याजवळचे नगदी सहा हजार ४०० रुपये व सहा हजाराचा मोबाईल असा १२ हजार ४०० रुपयाचा ऐवज जबरीने काढून घेतला. पिराजी मेटकर याच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात वरील तिघांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पुंगळे करत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth arrested again pistul in Nanded