पैठण तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

शेख मुनाफ
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

मुरादाबाद वाडी (ता.पैठण) येथील अनिल फुलसिंग गुसिंगे (वय 35) या तरुणाने शुक्रवारी (ता.15) राहत्या घरात दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली.

आडुळ (जि.औरंगाबाद) ः मुरादाबाद वाडी (ता.पैठण) येथील अनिल फुलसिंग गुसिंगे (वय 35) या तरुणाने शुक्रवारी (ता.15) राहत्या घरात दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली. अनिल यांच्या घरातील सर्व जण शुक्रवारी शेतात कापुस वेचण्यासाठी गेलेले असतांना त्याने दोरीच्या साहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. ही घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना समजली तेव्हा त्यांनी त्याला आडुळ (ता.पैठण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकारी सुरेंद्र कुलकर्णी यांनी तपासुन मृत घोषित केले. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कल्याण राठोड हे करित आहे.

टेम्पाे उलटल्याने एक ठार, पंधरा जखमी

 

पाचोड ः सेंधवा येथून जिनिंग कामासाठी मजुर घेऊन जाणारा भरधाव वेगातील टेंपो उलटून एक जण जागीच ठार तर पंधरा जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद -सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (ता. 14) सकाळी सात वाजेच्या सुमारास पाचोड (ता पैठण) जवळील दोदडगाव ( ता. अंबड) फाटयानजीक घडली.
       अधिक माअशी, सेंधवा हीती ( मध्यप्रदेश) येथील पंचवीस कामगार आपल्या कुटूंबियासह गेवराई ( जि. बीड) येथील जिनिंग प्रेसिंगवर कामासाठी उपरोक्त टेंपोने चालले होते. दोन दिवसापासून प्रवासामुळे झोप न झाल्याने दोदडगाव जवळ फौजी ढाब्यासमोर चालकाला डुलकी लागून वाहनावरचा ताबा सुटला व त्याच्या ताब्यातील भरधाव वेगातील टेंपो कोलांटया उड्या घेत रस्त्याखाली जाऊन उलटला. यांत दिनेश हिरालाल सोळंकी (वय 24) हा जागीच ठार तर संगीता हिरालाल सोळंकी ( वय 20),शितल यादव (वय 22) वर्षा सोळंकी (वय10), तुकाराम भावसिंग ( वय 12 ), मंजू कांतीलाल दुबे ( वय 20 ), पप्पू रमेश चव्हाण (वय 24), रेवती हिरालाल सोळंकी ( वय 24 ), घोडेलाल जयसिंग भुबरें (वय 20),ममनी सोळंकी, गणेश यादव, ग्रहेलाल ब्रम्हे, सर्व रा. आमसरी, जि. धरगूज ( म. प्र.) हे गंभीर जखमी झाले तर अन्य वीस जण किरकोळ जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच पाचोड, दोदडगाव डोणगाव, मुरमा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Committed Suicide In Paithan Taluka