औरंगाबाद: बाईक रेसिंगमध्ये 18 वर्षीय मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

चिखली ते दाबोळी विमानतळापर्यंत जाणारया रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.त्याही अवस्थेत वाहनचालक बेभान होऊन या रस्त्यावरून वाहने हाकत असतात. दूचाकीस्वार तर अंगात भूत संचारलेल्या अवस्थेत वाहन कायद्याचे उल्लंघन करून दूचाकी चालवितात, हा या मार्गावरील नित्याचा प्रकार बनला आहे.अनेकवेळा ट्राफिक पोलिस या मार्गावर तैनात असतात पण त्यांनाही वाहनचालक जुमानत नाहीत.

औरंगाबाद : चिखली विमानतळ मार्गावर केटीएम बाईकवरून रेसिंग लावलेली एक बाईक रस्त्याच्या मधोमध असलेल्या दूभाजकावर आदळल्याने एक 18 वर्षीय मुलगा जागीच ठार होण्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

या भयंकर अपघाताविषयी मिळालेल्या माहितीनुसार, दाबोळी विमानतळ रस्त्यावरुन दोन केटीएम बाईकमध्ये शर्यत लागली होती. वेगमर्यादाचे भान हरपून हे दोन्ही बाईकस्वार धूम स्टाईलने बेभानपणे वास्कोच्या दिशेने जात असताना एका बाईकची धडक दुभाजकाला बसली. ही धडक एव्हढ्या जोरात होती की, बाईकवर मागे बसलेला सोहेल खान उसळून रस्त्यावर आदळून जागीच गतप्राण झाला.तर बाईकस्वार शब्बिर शेख गंभीर जखमी झाला.

चिखली ते दाबोळी विमानतळापर्यंत जाणारया रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.त्याही अवस्थेत वाहनचालक बेभान होऊन या रस्त्यावरून वाहने हाकत असतात. दूचाकीस्वार तर अंगात भूत संचारलेल्या अवस्थेत वाहन कायद्याचे उल्लंघन करून दूचाकी चालवितात, हा या मार्गावरील नित्याचा प्रकार बनला आहे.अनेकवेळा ट्राफिक पोलिस या मार्गावर तैनात असतात पण त्यांनाही वाहनचालक जुमानत नाहीत.

आज दुपारी धुवाँधार पाऊसही कोसळत होता, त्यातच धूम स्टाईलने बाईकमध्ये शर्यत लावून कोवळ्या वयातील स्वार परमोच्च आनंद घेत असताना काळाचा घाला घातला, त्यात बायणा येथील 18 वर्षीय सोहेल खान ह्याचा जागीच मृत्यू झाला.तर बाईकस्वार शब्बिर शेख गंभीर जखमी झाला.त्याचीही परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच वास्को पोलिस घटनास्थळी धाऊन गेले. त्यांनी अपघाताचा पंचनामा केला.

Web Title: youth dead in bike racing at Aurangabad