Accident : महाशिवरात्री दिनी अज्ञात वाहनांच्या धडकेत युवकावर काळाने घातला घाला

उदगीर तालुक्यातील गंडी पाटी घाटात उदगीर-अहमदपूर रोडवर अज्ञात वाहनांच्या धडकेत एका २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
Accident News
Accident Newsesakal

उदगीर, (जि लातुर) - तालुक्यातील गंडी पाटी घाटात उदगीर-अहमदपूर रोडवर अज्ञात वाहनांच्या धडकेत एका २२ वर्षीय युवकाचा शुक्रवारी (ता. ८) रोजी सकाळी अकरा वाजता जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऐन महाशिवरात्री दिनी या युवकावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की शिवाजी अंकुश वाकळे (रा.येवरी ता. जळकोट) हा युवक शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान त्याच्या एम.एच.१२ पी.डब्ल्यू ९५९१ या क्रमांकाच्या दुचाकीवरून उदगीर येथून गावाकडे जात असताना गंडी पाटी घाटात अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. यात युवक जागीच ठार झाला.

या घटनेची माहिती लोकांनी ११२ वर कॉल करून दिली, अपघाताची माहिती मिळताच उदगीर ग्रामीणचे पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी भेट दिली.घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

एका अज्ञात ट्रकने या युवकास धडक दिली, त्या ट्रकचे टायर फुटलेले असताना रस्त्यावर वेडेवाकड ट्रक पळवण्यात येत होती. त्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळेच हा अपघात झाला असल्याचे या भागातील नागरिक सांगत आहेत.याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com