बस-दुचाकी अपघातात युवक ठार, लातूर जिल्ह्यातील घटना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

लातूर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील घरणी (ता. चाकूर) येथे एसटी बस आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी (ता. तीन) सायंकाळी पाच वाजता घडली.

वडवळ नागनाथ (जि. लातूर) : लातूर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील घरणी (ता. चाकूर) येथे एसटी बस आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी (ता. तीन) सायंकाळी पाच वाजता घडली. संतोष बाजीराव मेकले (वय २५, सोरा, ता. अहमदपूर) असे मृताचे नाव आहे.

 

संतोष हे न्यायालयीन काम आटोपून लातूरहून दुचाकीने गावाकडे परत जात होते. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घरणी येथील आयटीआय कॉलेजजवळ अहमदपूरहून लातूरकडे जाणाऱ्या एसटी बार्शी त्यांच्या दुचाकीची धडक झाली. यात संतोष जागीच ठार झाले. अपघातानंतर चाकूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कामत, नळेगाव येथील पोलिस जमादार दामोदर सिरसाट यांनी घटनास्थळी भेट दिली.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Died In Bus-Two Wheeler Accident Latur News