esakal | जेवणासाठी चाललेल्या युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू | Beed News
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity Shock

जेवणासाठी चाललेल्या युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

sakal_logo
By
भास्कर सोळंके

जातेगाव (जि.बीड) : शेजारच्याकडे जेवण करण्यासाठी चाललेल्या अठरा वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना शनिवार (ता.दोन) सायंकाळी उशिरा रेवकी येथील शेतवस्तीवर घडली. गोकुळ शिवाजी दहिफळे (वय १८, रा.रेवकी, ता.गेवराई) असे त्या युवकाचे नाव असून, सध्या पितृपंधरवाडा असल्याने शेजारील बंडु राऊत यांच्याकडे गोकुळ दहिफळे हा शनिवारी सायंकाळी जेवणासाठी जात असताना शेतातून गेलेल्या वीज पोलवरुन घरात वीज जोडणी घेतलेलेले वायर खाली आल्याने हातात घेताच गोकुळ यास विजेचा जबर धक्का बसला असल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

हेही वाचा: रस्त्याची बोंब! रुग्णालयात नेण्यापूर्वीच महिलेने दिला बाळाला जन्म

विजेचा धक्का बसल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळताच तात्काळ उपचारास गेवराई उपजिल्हा रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच गोकुळ दहिफळे याचा मृत्यू झाला. दरम्यान, गोकुळ याच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूबाबत रेवकी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

loading image
go to top