उन्हात होरपळून एकाचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

लोहारी भात्याची उष्णता आणि तळपणारे ऊन यामुळे होरपळल्यामुळे त्याला भोवळ येऊन थकवा जाणवू लागल्याने तातडीने उपचारासाठी त्यास जळगावच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आणले असता रस्त्यातच त्याचा मृत्यु झाला.

सोयगाव (जि. औरंगाबाद) - जरंडि तासोयगाव येथे रखरखत्या उन्हात होरपळून एकाचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात उष्माघातचा पहिला बळी ठरला आहे. सुनिल पंडित लोहार (वय 38) हा तरुण रविवारी दिवसभर लोहारी काम करत असताना लोहारी भात्याची उष्णता आणि तळपणारे ऊन यामुळे होरपळल्यामुळे त्याला भोवळ येऊन थकवा जाणवू लागल्याने तातडीने उपचारासाठी त्यास जळगावच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आणले असता रस्त्यातच त्याचा मृत्यु झाला.

सोमवारी सायंकाळी त्याचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मंगळवार ता. 8 तालुका प्रशासनाच्या पथकाने घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी तरुणाच्या मृत्यूची तालुका प्रशासनाने नोंद घेतली आहे. सोयगाव तालुक्यात उष्णतेची लाट पसरली आहे. चार दिवसापासून वाढत्या उष्णतेने तालुक्यात कहर केला आहे. जळगाव भुसावळच्या सीमारेषावर असलेल्या सोयगाव तालुक्यात तापमानात वाढ झाली असल्याने खानदेशातील उन्हाचा फटका सोयगाव तालुक्यात मोठा फटका बसला आहे. सोयगावला पारा 44 अंशाच्यावर गेल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: A youth dies due to sun hit