विहिरीत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

मित्रांसोबत मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतरावर्षीय युवकाला पोहण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने विहिरित बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना मादनी (ता. सिल्लोड) येथील नाटवी शिवारात बुधवारी (ता. 18) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. राजू समाधान बदर असे या युवकाचे नाव आहे. सकाळी सकाळी मित्रांसोबत फिरून झाल्यावर तो रस्त्याकाठच्या विहिरीत पोहणे शिकत होता.

शिवना (जि.औरंगाबाद) : मित्रांसोबत मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतरावर्षीय युवकाला पोहण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने विहिरित बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना मादनी (ता. सिल्लोड) येथील नाटवी शिवारात बुधवारी (ता. 18) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. राजू समाधान बदर असे या युवकाचे नाव आहे. सकाळी सकाळी मित्रांसोबत फिरून झाल्यावर तो रस्त्याकाठच्या विहिरीत पोहणे शिकत होता.

मात्र, पुरेसा सराव न झाल्याने तो जामिनीच्या समांतर पातळीला तुडुंब भरलेल्या विहिरीत बुडाला. मित्रांनी त्याचा पाण्यात खूप शोध घेतला. मात्र, पाण्याची पातळी खोल असल्याने त्यांना तळाशी जाता आले नाही. हतबल तरुणांनी ही बाब गावकऱ्यांच्या कानावर घातली. दुपार झाली तरी त्याचा मृतदेह तरंगून वर न आल्याने अजिंठा पोलिसांनी अखेर अग्निशमन दलाला पाचारण केले. दुपारी साडेबाराच्या सुमारास अग्निशमन दलाचे वाहन मादनी येथे दाखल झाले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाचे जवान, ग्रामस्थांच्या मदतीने या युवकाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आले. अजिंठ्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण आहेर, बीट जमादार रविकिरण भारती, दीपक भंगाळे आदींनी शर्थीचे प्रयत्न केले. अजिंठा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Drowned In Well