Parbhani| धुलीवंदनाच्या दिवशी रंगांची उधळण होत असताना...युवकाची आत्महत्या

धुलीवंदनानिमित्त सर्वत्र रंगांची उधळण होत असताना...
Parbhani News
Parbhani Newsesakal

जिंतूर (जि.परभणी) : धुलीवंदनानिमित्त सर्वत्र रंगांची उधळण होत असताना शुक्रवारी (ता.१८) तालुक्यातील पुंगळा येथे एका चोवीस वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शुभम भाऊराव जगताप असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार गावात गुरुवारी (ता.१७) होळीचा सण साजरा होत असताना रात्री आठच्या सुमारास शुभम जगताप या अविवाहित युवकाने गाव शिवारातील शेत आखाड्यावर विषारी औषध प्राशन केल्याची माहिती नातेवाईक व ग्रामस्थांना मिळताच त्यांनी आखाड्यावर धाव घेऊन शुभम यास एका खासगी वाहनाने जिंतूर (Jintunr) येथेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. (Youth Ended Himself In Jintur Taluka Of Parbhani)

Parbhani News
Parbhani Crime | धक्कादायक ! परभणीत वृद्ध जोडप्याचा निर्घृण खून

डाॅ.शिवाजी हरकळ यांनी प्राथमिक उपचार केले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला परभणी (Parbhani) येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात येत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यास परत ग्रामीण रुग्णालयात आणल्याचे ग्रामस्थांना समजल्याने पुंगळा गावासह परिसरातील नातेवाईकांनी मध्यरात्री रुग्णालयात एकच गर्दी केली होती. यावेळी घटना रात्री घडून देखील पोलीस प्रशासनाचा एकही अधिकारी, कर्मचारी रात्रभरात इकडे फिरकला नसल्याने नातेवाईक ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात होता.

Parbhani News
संगमनेर : विवाहित प्रेयसीची आत्महत्या; प्रियकराचा स्मशानात निर्घृण खून

दरम्यान, शुक्रवारी (ता.१८) सकाळी दहाच्या सुमारास पोलीस निरीक्षक दीपक शिंदे, सहपोलीस उपनिरीक्षक अर्जन पवार, पोलीस जमादार धनंजय गायकवाड, किरण शिंदे यांनी रूग्णालयात दाखल होत मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर डाॅ.शिवाजी हरकळ, रूग्णकक्ष सेवक गंगाधर पालवे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृत शुभम याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत घटनेची नोंद झाली नसल्याचे समजले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com