Parbhani Crime | धक्कादायक ! परभणीत वृद्ध जोडप्याचा निर्घृण खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder crime

Parbhani Crime | धक्कादायक ! परभणीत वृद्ध जोडप्याचा निर्घृण खून

ताडकळस (जि.परभणी) : येथून जवळच असलेल्या असोला (ता.परभणी) येथे एका वृध्द दाम्पत्याचा निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता.१६) सकाळी उघडकीस आली. दरम्यान या घटनेत अन्य एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परभणी (Parbhani) तालुक्यातील असोला येथील शंकरराव ग्‍यानोजी रिक्षे (वय ६५) व सारजाबाई शंकरराव रिक्षे हे (वय ६०) हे दोघे रात्री जेवण करून झोपले होते. त्यांच्या समवेत शंकरराव रिक्षे यांची मेहुणी गिरजाबाई गोविंद आडकिने याही मुक्कामी होत्या. आडकिने यांच्यासोबत घरात एक अज्ञात तरुण मुक्कामी होता अशी माहिती पोलिसांनी दिली. (Brutally Aged Couple Killed In Parbhani)

हेही वाचा: हिजाब वादात पाकिस्तानची उडी! धार्मिक स्वातंत्र्यावर व्यक्त केली चिंता

सकाळी शेजारील व्यक्तींनी रिक्षे दाम्पत्य अजून कसे उठले नाहीत म्हणून घराचे दार लोटून पाहिले असता, शंकरराव व सारजाबाई रिक्षे हे दोघे रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. तर गिरजाबाई आडकिने या गंभीर अवस्थेत बाजूला पडलेल्या दिसून आल्या. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तातडीने ताडकळस पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी धावून आले.

हेही वाचा: वसमतमध्ये तीन मुन्नाभाई डॉक्टरांवर कारवाई, वैद्यकीय साहित्य अन् औषधे जप्त

गिरजाबाई आडकिने यांना प्रत्यक्षदर्शींनी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक पाठवून तपासणी केली. बुधवारी (ता.१६) दुपारपर्यंत या प्रकरणात कोणतीही नोंद ताडकळस पोलिस ठाण्यात दाखल नव्हती.

Web Title: Brutally Aged Couple Killed In Parbhani

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top