Video : महाजनादेश यात्रेत 'मुख्यमंत्री गो बॅक';चा नारा; तरूणीची धरपकड

youth leader pooja more opposes CM mahajanadesh Yatra
youth leader pooja more opposes CM mahajanadesh Yatra

औरंगाबाद : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज जालना येथे मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. दुष्काळी परिस्थिती, कर्जमाफी याबद्दल ठोस निर्णय होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती विंगच्या प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे यांनी बुधवारी (ता. 28) राजूर ते जालना दरम्यान मुख्यमंत्री गो बॅकचा नारा दिला. त्यावेळी महिला पोलिसांऐवजी पुरुष पोलिसांनी त्यांना पकडले, गाडीत टाकले आणि तोंड दाबले.

पुरुष पोलिस एका मुलीला कसे काय हात लावू शकतात? दडपशाही करा पण कायद्यात राहून, कर्जमाफी मागणे गुन्हा आहे का? असे अनेक प्रश्न आता या व्हिडिओला पाहून सोशल मीडियातून विचारले जात आहेत. याचा सर्व स्तरातून निषेधही व्यक्त होत आहे.

स्वाभिमानी युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांना पोलिसांनी  दंडुकेशाहीची भूमिका घेत ताब्यात घेऊन मुस्कटदाबी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी या पोलीस कारवाई चा निषेध केला आहे. तसेच ही कारवाई करताना सरकारला लाज वाटली पाहिजे... कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्नदेखील राजू शेट्टी यांनी सरकारला विचारला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com