तरुणाईच्या कृत्यांनी समाजमन हादरले

मनोज साखरे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

औरंगाबाद - स्वार्थ, वर्चस्व व हव्यासापोटी दोघांनी आपल्याच मित्रांचे जीवन संपविले तर एकाने स्वत:ला संपविले. या घटनांनी समाजमन हादरले आहे. अविचारी प्रवृत्तींना रोखण्यासाठी वैचारिक अंकुश गरजेचा झाला आहे. 

औरंगाबाद - स्वार्थ, वर्चस्व व हव्यासापोटी दोघांनी आपल्याच मित्रांचे जीवन संपविले तर एकाने स्वत:ला संपविले. या घटनांनी समाजमन हादरले आहे. अविचारी प्रवृत्तींना रोखण्यासाठी वैचारिक अंकुश गरजेचा झाला आहे. 
शिक्षणासाठी पालक जिवाचे रान करून मुलांना घडविण्याचे प्रयत्न करतात. स्वप्ने पाहतात, परंतु बहुतांश तरुण मात्र याची जाणीव न ठेवता रस्ता सोडून पायवाट निवडतात. ध्येय सोडून अनावश्‍यक बाबींमागे लागतात. अशी विचारशून्य मने चक्रव्यूहात अडकत आहेत. त्यातून एकमेकांचे खून पाडण्यापर्यंत, चिरडण्यापर्यंत तरुणांची मजल जात असून प्रतिशोध, अविचारी वृत्तीमुळे ऐन उमेदीच्या काळातच यातील काहींना जगाचा निरोप घ्यावा लागला.

मुले असे का करताहेत?
   इंटरनेट ॲडिक्‍शनचा परिणाम
   वास्तवापासून दूर जात आहेत.
   मलाच मिळाले पाहिजे अशी वाढती वृत्ती
   भावनिक संतुलन साधण्यात असमर्थता
   सहकार्याच्या वृत्तीचा अभाव.
   भावनाशून्यता वाढीस लागत आहे.
   मुलांचे स्वत्व हरवत आहे.

याकडे लक्ष द्या
   चुकीचे आकलन करून टोकाचे निर्णय घेऊ नका.
   स्वतःच्या क्षमता ओळखा व विश्वास ठेवा.
   भविष्यात खूप संधी आहेत.
   आपले नैसर्गिक वर्तन, विचारांवर ठाम राहा.
   प्रेम करण्यासाठी आयुष्य पडले आहे, आधी करिअरकडे लक्ष द्या.
   आत्मविश्‍वास निर्माण करा, खचू नका.

मुलांशी असलेल्या नातेसंबंधावर विचार करणे आता नितांत गरजेचे झाले आहे. आपण कशासाठी जन्माला आलो, हे शोधा. एखाद्याचा खून करणे अथवा तरुणांनी मृत्यूला कवटाळणे हे अत्यंत चुकीचे आहे. आई-वडिलांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा मुलांचे वेळीच समुपदेशन करणे गरजेचे आहे. 
- संदीप शिसोदे, समुपदेशक.

Web Title: youth life society